शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज

By admin | Updated: March 23, 2015 01:39 IST

आजचे विद्यार्थी भविष्याचे नागरिक आहेत आणि भारत निर्माणासाठी त्यांचे योगदान हे अमूल्य राहणार आहे.

गोंदिया : आजचे विद्यार्थी भविष्याचे नागरिक आहेत आणि भारत निर्माणासाठी त्यांचे योगदान हे अमूल्य राहणार आहे. त्यामुळेच आजच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणे काळाची गरज आहे. हे काम अदानी फाऊंडेशन अपूर्व विज्ञान मेला यासारख्या कार्यक्रमांद्वारे करीत आहे, असे प्रतिपादन अदानी पॉवर लिमीटेडचे स्टेशन हेड सी.पी. साहू यांनी केले. अदानी फाऊंडेशनच्यावतीने छत्रपती दुबे प्राथमिक शाळेच्या मैदानात आयोजित अपूर्व विज्ञान मेला व प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उद्घाटन तिरोडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सी.जे. पटेल महाविद्यालयाचे उपप्राचार्य ए.बी. वाखले, चिखलीचे सरपंच कैलाश पटले, अदानी फाऊंडेशनचे समन्वयक सुबोध सिंग, सुरेश अग्रवाल उपस्थित होते. प्रास्ताविकात सिंग यांनी अपूर्व मेला व प्रदर्शनाचे आयोजन करण्यामागे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान या विषयाबद्दल आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्यातील वैज्ञानिकाला प्रेरणा मिळावी, हा उद्देश असल्याचे सांगितले. उद्घाटक उरकुडे यांनी, विज्ञान हे भारताला नवीन नसून ते परंपरागत आहे आणि हिच परंपरा जोपसण्याचे काम अदानी फाऊंउेशन अपूर्व विज्ञान मेला यासारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करीत आहे. त्यांचे हे कार्य अतिशय कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. तर वाखले यांनी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू प्रवृत्ती तसेच विज्ञानाशी मैत्री दृढ करण्याकरिता अतिशय स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे मत व्यक्त केले. अदानी फाऊंडेशनाच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या एकूण २२ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद हायस्कूल सुकडी-डाक, जिल्हा परिषद कन्या हायस्कूल तिरोडा तसेच जिल्हा परिषद हायस्कूल करटी (बु.) येथील ८४ विद्यार्थी तसेच २६ शिक्षकांनी या प्रदर्शनात भाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी घरगुती उपकरणे तसेच अतिशय अल्प दरात मिळणाऱ्या वस्तुंपासून प्रदर्शनामध्ये मॉडेल्स तयार केले होते. संचालन जयश्री काळे यांनी तर आभार राहुल शेजव यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)