शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्त युवा वर्गाची गरज

By admin | Updated: June 28, 2017 01:28 IST

दारु, गांजा, हॅरोईन, भांग, चरस, अफिम, व्हाईटनर, बोन फिक्स आदी सारख्या मादक पदार्थाचे व्यसन व्यक्तीला नाही तर

दिलीप भुजबळ पाटील : शहरात समता दिंडीचे आयोजन लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दारु, गांजा, हॅरोईन, भांग, चरस, अफिम, व्हाईटनर, बोन फिक्स आदी सारख्या मादक पदार्थाचे व्यसन व्यक्तीला नाही तर व्यक्तीच्या कुटूंबाचा सर्वनाश करतात. कोणतेही व्यसन समाजासाठी एका कॅन्सर रोगासारखे आहे. युवकांनी या व्यसनापासून मुक्त होवून दुसऱ्यांना व्यसन मुक्त करावे. चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी व्यसनमुक्त युवा वर्गाची काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी केले. आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ विरोधी दिनानिमित्त श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्थाद्वारे संचालित बाहेकर व्यसनमुक्ती केंद्राद्वारे आयोजीत समता दिंडीत ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिरीक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाचे मंगेश वानखेडे, समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा दलित मित्र ठाकुर, बाहेकर व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक विजय बाहेकर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी बाहेकर व्यसन मुक्ती केंद्राचे संचालक बाहेकर यांनी, गोंदियात सर्वाधिक दारुचे व्यसनी लोग आहेत. बाहेरील ब्राऊन शुगर व गांजाच्या व्यसनी लोकांना केंद्रात आणले जाते. जिल्ह्यात ५ वर्षापूर्वी २५-४० वर्षाचे लोक अधिक व्यसनी होते. परंतु आता त्यांची जागा १३-२५ वयोगटातील तरुणांनी घेतली आहे. केंद्राद्वारे आतापर्यंत ३००० व्यसनींना व्यसनमुक्त करण्यात आल्याचे सांगीतले. समता दिंडीची सुरुवात इंदिरा गांधी स्टेडियमपासून अतिरीक्त जिल्हाधिकारी मोहिते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. यावेळी राधाबाई बाहेकार नर्सिग शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी व बाहेकर व्यसनमुक्ती केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी कलापथक सादर करुन व्यसनमुक्तीचा संदेश दिला. रॅलीचे समापन भारतीय संविधानाचे रचयिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. बाहेकर व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक बाहेकर यांनी सर्व मान्यवरांना केंद्रातर्फे वृक्ष भेट केले. संचालन करून आभार राजेश मिश्रा यांनी मानले. कार्यक्रमासाठी बाहेकर व्यसनमुक्ती केंद्र व राधाबाई बाहेकर नर्सिग स्कूलचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी सहकार्य केले.