शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणातील नराधमाला २१ वर्षाचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

देवरी येथील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये राहणारा आरोपी अश्विन उर्फ सोनू विठ्ठल मेश्राम (२९) याने साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला. चिमुकली अंगणात खेळत असतांना तिला चॉकलेटचे आमिष देऊन आपल्या घरी नेले. तिच्यावर बळजबरी केली. आरोपीने त्या पिडीतेला दोन-चार वेळा चॉकलेट देण्याचे आमिष देऊन आपल्याकडे बोलावले होते. परंतु ती गेली नव्हती. परंतु आरोपीने संधी पाहून तिला आपल्या घरी नेले. तिच्यावर अत्याचार केला.

ठळक मुद्देजिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : पीडितेला ५० हजार रूपये मदत देण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देवरीच्या वॉर्ड क्र.९ येथील आरोपीने साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर १ जून २०१९ रोजी सकाळी ७.३० वाजता बलात्कार केला होता. या प्रकरणातील नराधमाला जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी २१ वर्षाच्या सश्रम कारावास व ७५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुणावली आहे. या दंडाच्या रकमेतील ५० हजार रूपये पिडीतेला द्यावे. दंड न भरल्यास ३ वर्षाचा अतिरिक्त कारावास जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावला आहे.देवरी येथील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये राहणारा आरोपी अश्विन उर्फ सोनू विठ्ठल मेश्राम (२९) याने साडेचार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला. चिमुकली अंगणात खेळत असतांना तिला चॉकलेटचे आमिष देऊन आपल्या घरी नेले. तिच्यावर बळजबरी केली. आरोपीने त्या पिडीतेला दोन-चार वेळा चॉकलेट देण्याचे आमिष देऊन आपल्याकडे बोलावले होते. परंतु ती गेली नव्हती. परंतु आरोपीने संधी पाहून तिला आपल्या घरी नेले. तिच्यावर अत्याचार केला. यासंदर्भात मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी नराधमावर देवरी पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ (ए,बी), बाल लैंगीक अत्याचार अधिनियमाचे कलम ६, १० अन्वये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाचा तपास देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी केला होता. न्यायालयात १५ साक्षदार तपासण्यात आले. आज (दि.७) रोजी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सुहास माने यांनी या प्रकरणावर सुनावणी केली. जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. महेश चांदवानी यांनी काम पाहिले. या घटनेला घेऊन देवरी येथील नागरिक पुढे आले होते. तीन दिवस बंद पुकारून आरोपीला त्वरीत शिक्षा व्हावी यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्यामुळे निकालाकडे देवरीवासीयांचे लक्ष होते.२५२ दिवसात आला निकालबाल लैंगीक अत्याचाराच्या घटनांकडे शासनाचे विशेष लक्ष आहे. देवरी येथे घडलेला गुन्हा ते न्यायालयाकडून दिलेला निर्णय हे एकंदरीत २५२ दिवसात हा निकाल देण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने त्वरीत दिलेल्या निकालामुळे आनंद व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Courtन्यायालय