शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

नागझिरा, नवेगावबांध अभयारण्याचे कार्यालय साकोली येथे करा

By admin | Updated: March 25, 2015 01:13 IST

नागझिरा, न्यू नागझिरा व नवेगावबांध अभयारण्याचे उपवनसंरक्षक (वन्यप्राणी) कार्यालय गोंदिया येथून साकोली येथे स्थानांतरीत करण्यात यावे...

साकोली : नागझिरा, न्यू नागझिरा व नवेगावबांध अभयारण्याचे उपवनसंरक्षक (वन्यप्राणी) कार्यालय गोंदिया येथून साकोली येथे स्थानांतरीत करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र दूरसंचार समितीचे सदस्य प्रभाकर सपाटे यांनी वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनातून केली आहे.नागझिरा, न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्प व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचा कारभार गोंदिया येथील उपवनसंरक्षक (वन्यप्राणी) यांच्या कार्यालयातून चालत आहे. या कार्यालयातून अभयारण्यातील कामकाजावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. साकोली येथे नागझिरा व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान येथे सहाय्यक उपवनसंरक्षक यांचे कार्यालय आहे. वनक्षेत्राधिकारी वनपाल, वनरक्षक व वनमजूर यांच्यावर साकोली व नवेगाव येथील कार्यालयातून नियंत्रण करण्यात येते.गोंदिया येथील कार्यालयात महिन्यातून आठ दहा वेळा जावे लागते. त्यामुळे शासनालाच त्याच्या भत्त्याचा भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच गोंदिया येथील कार्यालयातून अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानातील चोऱ्या, शिकारी या घटनावर नियंत्रण ठेवणे अशक्य होत आहे. पर्यटकांना आरक्षण व नोंदणीसाठी गोंदिया येथे नेहमीच संपर्क करावा लागतो. त्यामुळे दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या घटत आहे. नागझिरा अभयारण्यातून गेल्या दहा ते पंधरा वर्षात कोट्यवधींची वनसंपदा नष्ट झाली आहे. अवैध शिकारीचे सुद्धा प्रकरण बरेच गाजले आहे. त्यामुळे सर्व कारभार साकोली येथून करण्यात यावा. साकोलीपासून नागझिरा १८ कि.मी. व न्यू नागझिरा १५ कि.मी. व नवेगावबांध ३० कि.मी. अंतरावर आहे. साकोली हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असून नागपूर विमानतळ १०० कि.मी. व सौंदड रेल्वे स्टेशन १० कि.मी. अंतरावर आहे. पर्यटकांना सुद्धा उपवनसंरक्षक (वन्यप्राणी) यांचे कार्यालय साकोली येथे मध्यस्थानी होईल व सोयीचे सुद्धा होईल. या कार्यालयासाठी साकोली येथे जागा पुरेशी असून मनुष्यबळही उपलब्ध आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळावा व गैरसोय टाळण्यासाठी साकोलीत कार्यालयाची गरज आहे.