शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

माझे आंदोलन व्यक्ती नव्हे, तर वृत्तीविरोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 05:00 IST

आमदार रणजित कांबळे यांनी वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना मोबाईलवरून अश्लील शिवीगाळ करून अपमानास्पद भाषेचा वापर केला. एवढेच नव्हे, तर जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा जिल्हाभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. आमदार कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, त्यांना अजूनही अटक करण्यात आलेली नाही. कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी अहोरात्र रुग्णसेवेत कार्यरत आहेत.

ठळक मुद्देसमीर गहाणे यांचे जि. प.समोर छत्री आंदोलन सुरू : कारवाई करा

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  :  वर्धा जिल्ह्यातील पुलगाव देवळी मतदारसंघाचे आमदार रणजित कांबळे यांनी ९ मे रोजी जिल्हा परिषद वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. या घटनेचा निषेध करीत खोडशिवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर गहाणे यांनी मागील बुधवारपासून छत्री आंदोलन सुरू केले आहे, तर मंगळवारपासून गोंदिया जि. प.समोर आंदोलन सुरू केले आहे. आमदार रणजित कांबळे यांनी वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना मोबाईलवरून अश्लील शिवीगाळ करून अपमानास्पद भाषेचा वापर केला. एवढेच नव्हे, तर जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा जिल्हाभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. आमदार कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, त्यांना अजूनही अटक करण्यात आलेली नाही. कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी अहोरात्र रुग्णसेवेत कार्यरत आहेत. त्यांनाच अशा भाषेत बोलून अपमानीत केले जाणे योग्य नाही. एकीकडे डॉक्टरांना कोरोना योध्दा म्हटले जात आहे. मात्र दुसरीकडे त्यांच्यावरच हल्ले होत असताना, राज्य सरकारकडून कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टरांमध्ये आता संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. माझे आंदोलन हे कुठल्या व्यक्तीविरुध्द नसून वाईट प्रवृत्ती आणि वाईट घटनांविरुध्द आहे. अशा घटनांना वेळीच आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, यासाठीच मागील सात दिवसांपासून मी छत्री आंदोलन सुरू केले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर गहाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  

प्रशासन कधी घेणार दखल? अलीकडे डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कोरोना संसर्ग काळात डॉक्टर्स आपला जीव धोक्यात घालून चोवीस तास सेवा देत आहेत. मात्र त्यांच्यावरच हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करण्यात कुचराई केली जात आहे. डॉ. समीर गहाणे यांनी मागील सात दिवसांपासून या सर्व प्रकाराबद्दल छत्री आंदोलन सुरू केले आहे. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर