शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मुर्री रोडवासीयांचे ‘बल्ले-बल्ले’

By admin | Updated: April 30, 2015 01:04 IST

उखडलेला रस्ता व त्यात रस्ता दुभाजक यामुळे त्रासून गेलेल्या चंद्रशेखर वॉर्ड मुर्री रोडवासीयांनी आगळ््यावेगळ््या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

गोंदिया : उखडलेला रस्ता व त्यात रस्ता दुभाजक यामुळे त्रासून गेलेल्या चंद्रशेखर वॉर्ड मुर्री रोडवासीयांनी आगळ््यावेगळ््या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शिवाय राजकारण्यांचे हात-पाय न जोडता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली व्यथा मांडली. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश लाभले असून खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी या रस्त्याला भेट देत एका महिन्याच्या आत रस्ता बांधकामाचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. येथील मुर्री रोड रस्ता अगोदरच अरूंद असून पूर्णपणे उखडलेला आहे. अशात या रस्त्यावर पालिकेने रस्ता दुभाजक तयार केल्याने हा रस्ता अधिकच अरूंद झाला आहे. उखडलेल्या रस्त्यामुळे दररोज येथे अपघात घडत आहेत. या प्रकारामुळे या मार्गावरील नागरिक त्रस्त असून त्यांनी कुणा राजकारण्यांचे हात-पाय न जोडता आपला रोष एका होर्डीगच्या माध्यमातून व्यक्त केला. त्यांची ही शक्कल शहरात चांगलीच फेमस झाली व सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. मात्र एवढ्यावरही काहीच न झाल्याने येथील नागरिकांनी मंगळवारी (दि.२८) थेट जिल्हाधिकारी विजय सुयर्वंशी यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली समस्या मांडली. एवढेच नव्हे तर त्यांची मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. या नागरिकांची समस्या लक्षात घेत जिल्हाधिकारी सुर्यवंशी यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना सोबत घेत मुर्री रोडची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना या रस्त्यावरील विद्युत खांब हटवून एका महिन्याच्या आत रस्ता दुरूस्त करण्याचे आदेश दिले. तर नगरपरिषद मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण हटविण्याचेही आदेश दिले. दरम्यान बुधवारी (दि.२९) सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा जनबंधू यांनीही रस्त्याची पाहणी केली. विशेष म्हणजे या रस्त्याच्या विषयाला घेऊन जिल्हाधिकारी सुर्यवंशी यांनी बुधवारी दुपारी संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली असल्याचीही माहिती आहे. एकंदर मुर्री रोडी वासीयांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यांची बल्ले-बल्ले झाली आहे. (शहर प्रतिनिधी)