शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

बौद्ध बांधवांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: October 26, 2015 01:54 IST

अखिल भारतीय आझाद बौद्ध धम्म सेना बिहारचे संस्थापक सेनानायक भंते बुद्धे शरण यांच्या नेतृत्वात अल्पसंख्यक भारतीय बौद्धांच्या सामाजिक, ....

गोंदिया : अखिल भारतीय आझाद बौद्ध धम्म सेना बिहारचे संस्थापक सेनानायक भंते बुद्धे शरण यांच्या नेतृत्वात अल्पसंख्यक भारतीय बौद्धांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी शनिवारपासून (दि.२४) जिल्हाधिकारी कार्यालय गोंदियासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी गठित राजेंद्र सच्चर कमिटीसारखीच अल्पसंख्यक बौद्ध समाजाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी अन्य उच्च समिती गठित करून संसदेला सोपविण्यात यावी. केंद्र शासनाने महाराष्ट्रातील नवबौद्धांना आपल्या अल्पसंख्यांक आयोगामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमध्ये त्यांना हिंदू दर्शविले आहे. केंद्र शासनाने हिंदू न दर्शविता बौद्ध दर्शवावे व अल्पसंख्यक आयोगाच्या यादीमध्ये बौद्ध दर्शवून त्यांना आयोगानुसार सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्यावे. या मागण्यांसाठी उपोषण व धरणे आंदोलन सुरू असून जिल्ह्यातील संपूर्ण बुद्धिस्ट समाज संघाचा पाठिंबा आहे. आंदोलनकर्त्यांमध्ये लॉर्ड बुद्धा मैत्री संघाचे जिल्हाध्यक्ष रतन वासनिक, डी.वाय. फुले, सेवक बन्सोड, एस.डी. राहुल, प्रभा गडपाल, पौर्णिमा रंगारी, कल्पना मेश्राम, प्रतिभा खोब्रागडे, रंजना भिमटे, मंगला मेश्राम, जिजन निकोशे, कला भालाधरे, मेहतरीन मडामे, मीरन मेश्राम, विद्या गणवीर, शोभा रामटेके, आशा रंगारी, दीपिका रंगारी, बोरकर तसेच इतर उपासक व उपासिका यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)