आई व मुलाचा तलावात बुडून मृत्यू ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:19 IST2021-06-23T04:19:34+5:302021-06-23T04:19:34+5:30

प्राप्त माहितीनुसार हिरापूर येथील सागर धुर्वे हा सोमवारी शेतशिवारात जनावरांना चराईसाठी घेऊन गेला होता. मात्र, तो सायंकाळपर्यंत घरी परत ...

Mother and child drown in lake () | आई व मुलाचा तलावात बुडून मृत्यू ()

आई व मुलाचा तलावात बुडून मृत्यू ()

प्राप्त माहितीनुसार हिरापूर येथील सागर धुर्वे हा सोमवारी शेतशिवारात जनावरांना चराईसाठी घेऊन गेला होता. मात्र, तो सायंकाळपर्यंत घरी परत न आल्यामुळे त्याची आई वच्छला ही त्याचा शोध घेण्यासाठी शेतशिवारात गेली होती. दरम्यान तलावाच्या पाळीवरून तिचा पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर मुलाचा देखील याच तलावात तोल जाऊन मृत्यू झाला. मंगळवारी सकाळच्या सुमारास शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर गावात याची माहिती पोहोचताच गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली. तसेच या घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना दिली. आई व मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याने हिरापूर गावावर शोककळा पसरली होती. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन मैत्रे यांच्या मार्ग॔दर्श॔नाखाली पोलीस हवालदार राखडे करीत आहेत.

Web Title: Mother and child drown in lake ()