शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रावणवाडी परिसरात दुधात भेसळ सुरूच

By admin | Updated: August 12, 2014 00:01 IST

दुधासारख्या अत्यावश्यक आणि प्रत्येक घरातील दैनंदिन गरज असणाऱ्या घटकात वाढत असलेली भेसळ सर्वांसाठी चिंतेचा विषय झाली आहे. काही बड्या लोकांच्या दूुध संस्थांमध्येही

रावणवाडी : दुधासारख्या अत्यावश्यक आणि प्रत्येक घरातील दैनंदिन गरज असणाऱ्या घटकात वाढत असलेली भेसळ सर्वांसाठी चिंतेचा विषय झाली आहे. काही बड्या लोकांच्या दूुध संस्थांमध्येही या भेसळीला प्रोत्साहन दिले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. विशेष म्हणजे या भेसळीला आळा घालण्याची जबाबदारी ज्या अन्न व औषध प्रशासन विभागाची आहे त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.प्रत्येकाची दैनंदिन गरज असलेल्या दुधामध्ये रासायनिक वस्तंूची भेसळ केली जात आहे. असे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. मात्र स्थानिक अन्न व औषध प्रशासन विभागाकडून उत्पादक व वितरक या दोघांवरही कारवाई होत नसल्याचे दिसते. अनेकांच्या दिवसाची सुरुवात दुधापासूनच तयार केलेल्या चहापासून होते. तसेच पौष्टीक आहार म्हणून डॉक्टरदेखील रुग्णांना व लहान मुलांना दूध पिण्याचा सल्ला देतात. मात्र सध्या मिळण्याऱ्या दुधाच्या शुद्धीकरणावर त्यात भेसळीमुळे प्रश्न निर्माण झाले आहेत. दररोज सेवन करीत असलेल्या दुधामध्ये पौष्टीकता कमी आणि भेसळ युक्त पदार्थांचा वापरच अधिक प्रमाणात होते. असे प्रकार अनेकदा अनेक ठिकाणी आढळून येत आहेत.बऱ्याच दूध विक्रेत्यांनी दुधात भेसळ करुन विक्री करण्याच्या आपला अनधिकृत व्यवसाय सुरू केला आहे. असा बेकायदेशिर व्यवसाय करून आपण आपल्याच लोकांच्या जीवनाशी खेळ करीत आहोत.मागील काळात स्थानिक अन्न व औषध प्रशासन विभागाने अनेक दूध डेअरींची तपासणी केल्या. त्यांनी खवा व दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याच्या व्यवसायांवर धाडी घातल्या. शेकडो किलो भेसळयुक्त खवा जप्त करून नाहिसा केला होता. काही दूध विक्रेत्यांच्या दुकानांमधून भेसळीकरिता साठवून ठेवलेल्या रासायनिक पदार्थाचा साठा जप्त केला होता. त्यावेळी याच रासायनिक पदार्थांपासून रासायनिक दुधाची निर्मिती होत असते, असे डेअरी संचालकापासूनच कळले होते. बऱ्याच काळापासून एकाही दूध उत्पादकावर आणि वितरकावर कारवाई झाल्याचे ऐकण्यात आले नाही. त्यामुळे दूध विक्रेत्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढतच असून मानवी आरोग्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. या विरोधात विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे. (वार्ताहर)