स्थलांतरितांमुळे वाढला ग्रीन झोनमध्ये धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 05:00 AM2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:00:31+5:30

कोरोना बाधीतांची शुन्य संख्या असलेल्या जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा अचानक पाचवर पोहचला. हाच धोका गोंदिया जिल्ह्याला सुध्दा आहे.गोंदिया जिल्ह्यात मागील ३८ दिवसांपासून एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही म्हणून जिल्हावासीय आणि प्रशासन सुध्दा बिनधास्त असल्याचे चित्र आहे.

Migrants increased the risk in the green zone | स्थलांतरितांमुळे वाढला ग्रीन झोनमध्ये धोका

स्थलांतरितांमुळे वाढला ग्रीन झोनमध्ये धोका

Next
ठळक मुद्देप्रशासनाची होतेय डोळेझाक : बाहेरुन येणाऱ्यांचा मुक्त वावर, आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने युध्द पातळीवर उपाययोजना राबवून कोरोनाचा प्रादुर्भाव होणे टाळले. त्यामुळेच मागील ३८ दिवसांपासून जिल्हा कोरोनामुक्त आहे. मात्र मागील आठवडाभरापासून प्रशासन थोडे सैल झाले असून बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्यांकडे त्यांची डोळेझाक झाली आहे. परिणामी बाहेरुन येणाºयांचा मुक्त संचार वाढला असून ग्रीन झोनमध्ये कोरोनाचा शिरकाव होण्याचा धोका वाढला आहे.
पहिला लॉकडाऊनपासून लगतचा गडचिरोली जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये होता. विदर्भातील एकमेव सेफ झोनमध्ये असलेला हा जिल्हा होता. मात्र या जिल्ह्यात सुध्दा सोमवारी (दि.१८) स्थलांतरित मजुरांमुळे कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
कोरोना बाधीतांची शुन्य संख्या असलेल्या जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा अचानक पाचवर पोहचला. हाच धोका गोंदिया जिल्ह्याला सुध्दा आहे.गोंदिया जिल्ह्यात मागील ३८ दिवसांपासून एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही म्हणून जिल्हावासीय आणि प्रशासन सुध्दा बिनधास्त असल्याचे चित्र आहे. मात्र हा बिनधास्तपणा योग्य काळजी घेतली नाही तर मोठे संकट पुन्हा निर्माण करु शकते. गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे.
शिवाय केंद्र आणि राज्य शासनाने विविध राज्य आणि जिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरित मजूर आणि नागरिकांना त्यांच्या स्वगृही पाठविण्यासाठी बसेस आणि रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे बाहेरील जिल्हा आणि राज्यातून दररोज नागरिक दाखल होत आहे. शिवाय अजुनही बरेच मजूर पायीच आपल्या स्वगृही परतत आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जाणारे मजूर अजुनही जिल्ह्यातून रेल्वे मार्गाने पायी जात असल्याचे चित्र दररोज पाहयला मिळत आहे. तर महाराष्टÑ-छत्तीसगडच्या सीमेवरील देवरी तालुक्यातील सिरपूर येथील सीमा तपासणी नाक्यावरील चित्र आणखी भयावह आहे. बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाºयांपैकी किती जणांची आरोग्य तपासणी केली जात आहे यावर सुध्दा प्रश्न चिन्ह आहे.
रविवारी (दि.१७) गुजरातवरुन काही लोक बसने गोंदिया येथे आले. ते जिल्ह्यात आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने त्यांची साधी चौकशी केली नाही.
आरोग्य तपासणी तर दूरच राहिली. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींकडे डोळेझाक करणाºयामुळे ग्रीन झोन असलेल्या गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता आता बळावली आहे.

प्रशासनाचा दुर्लक्षितपणा भोवू शकतो
कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव होवू नये म्हणून सुरूवातीला जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन या तिन्ही विभागाने युध्द पातळीवर काटेकोरपणे उपाययोजना राबविल्या. त्यामुळेच जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यात यश आले होते. मात्र मागील आठवडाभरापासून प्रशासनाची भूमिका सैल झाल्याने कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे हा दुर्लक्षितपणा भोवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Migrants increased the risk in the green zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.