शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणमध्ये मीटरचे गौडबंगाल

By admin | Updated: April 27, 2016 01:43 IST

जिल्ह्यात एकीकडे पुरेशा प्रमाणात वीज मीटर उपलब्ध असल्याचे अधिकारी सांगत असले तरी ग्रामीण भागात मात्र मीटरचा तुटवडा जाणवत आहे.

ग्रामीण भागात सदोष मीटर : अधिकारी म्हणतात, अतिरिक्त मीटरचा पुरवठागोंदिया : जिल्ह्यात एकीकडे पुरेशा प्रमाणात वीज मीटर उपलब्ध असल्याचे अधिकारी सांगत असले तरी ग्रामीण भागात मात्र मीटरचा तुटवडा जाणवत आहे. मिळालेले मीटर सदोष (फॉल्टी) असल्याचे ग्रामीण भागातील कर्मचारी सांगत आहेत. त्यामुळे मीटरचे हे गौडबंगाल नेमके काय आहे, अशी संभ्रमावस्था वीज ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे. दुसरीकडे पुरवठा झालेले अनेक मीटर सदोष निघत असल्यामुळे ते बदलविण्यासाठीही धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.महावितरणच्या गोंदिया सर्कस अंतर्गत गोंदिया आणि देवरी हे दोन विभाग कार्यरत आहेत. त्यापैकी देवरी विभागात देवरी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, आमगाव आणि सालेकसा हे पाच तालुके येतात तर गोंदिया विभागात गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तीन तालुक्यांचा समावेश होतो. महावितरणच्या गोंदिया सर्कलमधील कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांच्या म्हणण्यानुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या आर्थिक वर्षात ४२ हजार घरगुती मीटर जिल्ह्यात वाटण्यात आले. त्यापैकी ३१ हजार २७७ मीटर जुने आणि नादुरूस्त मीटर बदलविण्यासाठी वापरण्यात आले तर ९ हजार ९३८ मीटर नवीन जोडणीसाठी वापरले आहेत. आता १० हजार मीटर शिल्लक आहेत. याशिवाय एप्रिल महिन्यात देवरी आणि गोंदिया विभागांना प्रत्येक ४ हजार असे ८ हजार मीटर अतिरिक्त दिले आहेत. त्यामुळे मीटरसाठी कोणत्याही ग्राहकाची अडवणूक होणे शक्य नाही, असे हे अधिकारी ठामपणे सांगत आहेत.आजघडीला देवरी विभागात ६३ आणि गोंदिया विभागात १५८ असे फक्त २२१ प्रस्ताव मीटरच्या प्रतीक्षेत असून त्यांची तपासणी करून त्यांना मीटर देण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. असे असले तरी ग्रामीण भागात मात्र वीज कर्मचाऱ्यांकडून चांगले मीटर उपलब्ध नसल्याची सबब सांगून मीटर लावण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे यात नेमके काय गौडबंगाल आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.मुख्य अभियंत्यांनी गेल्या आठवड्यात एक अध्यादेश काढून नादुरूस्त मीटर बदलवून ‘स्टँडर्ड आॅफ परफॉर्मन्स’ प्रमाणे मीटर लावण्याचा आदेश काढला. त्यामुळे महावितरणला सदोष (फॉल्टी) मीटरचा पुरवठा झाल्याच्या शंकेला दुजोरा मिळत आहे. मात्र महावितरणकडून याबाबत स्पष्टपणे काहीच न सांगता सर्वकाही ‘आॅल इज वेल’ असल्याचे भासविले जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)दोन कंपन्यांवर बंदीगोंदिया-भंडारा जिल्ह्यातील वीज ग्राहकांसाठी तुमसर येथे असलेल्या महावितरणच्या भांडार विभागातून साहित्याचा पुरवठा होतो. कोणत्या विभागासाठी किती मीटर मंजूर झाले त्याचे पत्र वरिष्ठांकडून आल्यानंतर तुमसरच्या भांडार विभागातून त्या साहित्याची उचल केली जाते. त्यात रोलेक्स आणि फ्लॅश या कंपन्यांच्या मीटरमध्ये बिघाड होत असल्यामुळे या कंपन्यांचे मीटर वापरू नका, असा स्पष्ट आदेश गेल्या १० मार्चला वरिष्ठ स्तरावरून महावितरणच्या कार्यालयांना देण्यात आला. त्यामुळे या मीटरच्या बदलीत दुसऱ्या कंपनीचे मीटर हवे असताना ते मिळत नसल्याची कुरबूर ग्रामीण भागात सुरू आहे.