शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

६ हजार ३१३ महिलांचे मातृवंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 06:00 IST

ग्रामीण भागातील गर्भवती महिलांची गर्भावस्थेत योग्य काळजी घेतली जावी व त्यांना सकस आहार मिळावा यासाठी त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने तीन टप्यात पाच हजार रूपये केंद्र शासनाने देण्याचे ठरविले आहे. केंद्र सरकार मार्फत गरोदर महिला-स्तनदा मातेस पाच हजार रूपये पंतप्रधान मातृ वंदन योजनेतून दिले जात आहे.

ठळक मुद्देलाभासाठी कोणतीही अट नाही : पहिल्या अपत्याच्या वेळी मिळतात पाच हजार रूपये

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बाल आणि माता मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. जननी शिशू सुरक्षा योजनेपासून माहेर घर, हिरकणी कक्षापर्यंतच्या सोयी गर्भवतींसाठी केल्या जात आहे. मात्र यानंतरही मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे गर्भवतींना पहिल्या अपत्यासाठी शासन मातृ वंदन योजनेतंर्गत पाच हजार रूपयांचे अनुदान देत आहे.ग्रामीण भागातील गर्भवती महिलांची गर्भावस्थेत योग्य काळजी घेतली जावी व त्यांना सकस आहार मिळावा यासाठी त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने तीन टप्यात पाच हजार रूपये केंद्र शासनाने देण्याचे ठरविले आहे. केंद्र सरकार मार्फत गरोदर महिला-स्तनदा मातेस पाच हजार रूपये पंतप्रधान मातृ वंदन योजनेतून दिले जात आहे. विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीे हा अनुसूचित जाती, जमाती व द्रारिद्रय रेषेखालील असावा अशी कोणतीही अट नाही. पहिल्या अपत्यासाठी नोकरदार महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. मात्र अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा सेविका यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या व्यतिरीक्त जननी सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी पूर्वीप्रमाणेच अनुदान देण्यात येणार आहे.लाभार्थ्यांच्या बँक, पोस्ट खात्यावर (डीबीटी) ही रक्कम जमा होणार आहे. यासाठी लाभार्थीचे खाते क्रमांक व आधार क्रमांक आवश्यक आहे.६३१३ महिला पात्रसन २०१९ या वर्षात गर्भवती झालेल्या महिलांपैकी जी महिला पहिल्यांदाच गर्भवती झाली त्या महिलांना या योजनेचा लाभ दिला गेला आहे. गोंदिया जिल्ह्यात १२ हजार १६ महिला गर्भवती असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. यातील सहा हजार ३१३ महिला पहिल्यांदाच गर्भवती असल्याचे पुढे आले आहे. या महिलांना या योजनेचा लाभ दिला गेला आहे.असा मिळणार लाभगर्भवतीच्या नोंदणीवेळी एक हजार रूपये देण्यात येते. यासाठी गर्भवती होण्याच्या १५० दिवसांत नोंदणी करणे आवश्यक आहे. गरोदरपणाला सहा महिने पूर्ण होताच दोन हजार रूपये देण्यात येतील. त्यासाठी किमान एक तपासणी करणे आवश्यक आहे. प्रसूतीपश्चात बालकाची जन्मनोंद व पेंटाव्हॅलन्ट ३ रा डोज दिल्यानंतर (१४ आठवडे) लसीकरण पूर्ण झाल्यावर तिसऱ्या टप्यातील दोन हजार रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजना