शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अनेकांवर निवडणुकीपासून वंचित राहण्याची पाळी

By admin | Updated: May 8, 2015 00:59 IST

गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंतच्या निवडणुकीसाठी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या

बोंडगावदेवी : गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंतच्या निवडणुकीसाठी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे शक्तीचे करण्यात आले आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक कागजपत्रांची जुळवाजुळव करून प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर केल्यानंतरही दोन वर्षाचा कालावधी लोटून जावून सुध्दा अजूनपावेतो सबंधित अर्जदारांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळालेच नाही अशी तालुक्यात सर्वत्र ओरड आहे. अर्जुनी-मोरगाव तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागामधील सबंधित लिपीकाकडे जात पडताळणी प्रमाणपत्रांचे काम सोपविले असल्याचे समजते. तालुक्यात गेल्या दोन-तीन वर्षापूर्वी काही ग्राम पंचायतीच्या निवडणुका पार पाडल्या. ग्रामपंचायतच्या निवडणुकीतील राखीव प्रभागातून उमेदवारी भरणाऱ्या इच्छुकांनी सर्व आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून अर्जानिशी जात पडताळणी प्रमाणपत्राची फाईल तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागातील सबंधीत लिपीकाकडे दोन वर्षापूर्वीच सादर केल्या. जात पडताळणी प्रस्ताव सादर करणाऱ्या अर्जदारापैकी काही जन निवडुणकीमध्ये निवडून सुध्दा आले. अर्धा कालावधी संपत आला. परंतु जात पडताळणी प्रमाणपत्र मात्र अजून त्या अर्जदाराच्या हाती मिळालाच नाही, अशी ओरड तालुक्यात सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत ज्या उमेदवारांनी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवून निवडून आले. त्यांना सुध्दा अजून पावेतो जात पडताळणी प्रमाणपत्र मिळालेच नाही. तहसील कार्यालयातील सबंधीत लिपीक उडवा-उडवीचे उत्तर देऊन वेळ मारुन नेत असल्याची कैफीयत प्रस्ताव सादर करणाऱ्यांनी मांडली. दोन वर्षापूर्वी सादर केलेले जात पडताळणी प्रमाणपत्राचे प्रस्ताव संबधीत लिपीकाच्या कपाटामध्ये धूळखात पडून असल्याचे बोलल्या जात आहे. प्रस्ताव सादर करून दोन वर्षाचा कालावधी लोटून सुध्दा अर्जदाराच्या जात पडताळणी प्रस्तावाला गती येत नाही. त्या प्रस्तावाकडे सबंधीत विभाग ढूंकून सुध्दा पाहत नाही. याला सर्वस्वी जबाबदार संबधीत विभागाला धरण्यात यावी अशी मागणी अर्जदार करित आहेत. सर्व कागदपत्राची पूर्तता करून सुध्दा जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेच्या आत मिळत नसल्याने, अनेकांना निवडणुकीत उभे राहण्यापासून वंचित राहावे लागत आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे आजही तालुक्यातील ग्रामपंचायतच्या काही राखीव जागा रिक्त असल्याचे समजते. येत्या काही दिवसात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. सदर निवडणुकीसाठी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र नामांकन अर्ज भरतानी सादर करणे आवश्यक राहणार आहे.