शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; बंडखोरीमुळे चुरशीची आणि काट्याची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

लोकसभा निवडणुकी दरम्यानच विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तयारी सुरू केली होती. यासाठी त्यांनी आपल्या मतदारसंघातून आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य कसे मिळवून देता येईल याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले. यात काहींना यश सुध्दा आले. त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची खात्री होती.

ठळक मुद्देचार विद्यमान आमदारांचे अस्तित्व पणाला। मत विभाजनाचा फटका कुणाला, निवडणुकीचा ज्वर वाढला

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अर्जुनी मोरगाव मतदारसंघ वगळता जिल्ह्यातील उर्वरित तीन्ही मतदारसंघात बंडखोरांचे आव्हान कायम असल्याने या मतदारसंघामध्ये चुरशीची आणि काट्याची लढत होण्याची शक्यता आहे. पक्षातीलच बंडखोरांनी निवडणुकीत उमेदवारी कायम ठेऊन आव्हान उभे टाकल्याने मतांचे विभाजन होणे अटळ आहे. त्यामुळे मतांचा विभाजनाचा फटका नेमका कुणाला बसतो आणि कुणाचे विजयाचे समीकरण बिघडते हे सुध्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.लोकसभा निवडणुकी दरम्यानच विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तयारी सुरू केली होती. यासाठी त्यांनी आपल्या मतदारसंघातून आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य कसे मिळवून देता येईल याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले. यात काहींना यश सुध्दा आले. त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची खात्री होती. मात्र तसे न झाल्याने इच्छुक उमेदवारांचा हिरमोढ झाला त्यामुळे त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बंडखोरांना शांत करण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले. मात्र अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ वगळता इतर मतदारसंघात यश आले नाही.अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात बंडखोरी न झाल्याने भाजप-सेना युतीचे उमेदवार राजकुमार बडोले आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहर चंद्रिकापूरे यांच्यात चुरशीची आणि काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्षाचे उमेदवार किती मते घेतात यावर या दोन्ही पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाची आघाडी ठरणार आहे.गोंदिया विधानसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे अधिकृत उमेदवार गोपालदास अग्रवाल आणि भाजपचे बंडखोर उमेदवार विनोद अग्रवाल यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसचा उमेदवार नवखा असल्याने आणि या दोन्ही उमेदवारांच्या तुलनेत जनसंर्पकाचा अभाव असल्याने तिसºया क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. बंडखोर उमेदवारामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढतीचे चित्र राहू शकते.आमगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आ. रामरतन राऊत यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने येथे सुध्दा तिहेरी सामना रंगण्याची शक्यता आहे.भाजपचे संजय पुराम आणि काँग्रेसचे सहषराम कोरोटे या दोघांनी मागील पाच वर्षांपासून मतदारसंघात जनसंर्पक कायम ठेवला. त्यामुळे खरी लढत जरी कोरोटे आणि पुराम यांच्यात असली तरी या दोघांच्या विजयाचे समीकरण मात्र रामरतन राऊत नेमकी किती मते घेतात यावरुन ठरू शकते. तिरोडा मतदारसंघात सुध्दा असेच चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने माजी आ.दिलीप बन्सोड यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्धार करीत निवडणूक रिंगणात उडी घेतली. तर भाजपने विद्यमान आ.विजय रहांगडाले यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करीत संधी दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले गुड्डू बोपचे यांना उमेदवारी दिली.त्यामुळे या मतदारसंघात रहांगडाले, बोपचे, बन्सोड असा तिहेरी सामना रंगण्याची चिन्हे आहे. यामुळे मतांचे सुध्दा विभाजन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असून तसे झाल्यास विजयाचे अंतर फार कमी मतांचे राहील. त्यामुळे हे अंतर कुणासाठी अनुकुल होईल हे २४ तारखेलाच स्पष्ट होईल. एकंदरीत अर्जुनी मोरगाव, तिरोडा आणि आमगाव विधानसभा मतदारसंघात तिहेरी आणि काट्याची लढत होण्याची शक्यता आहे.प्रचाराचा ज्वर वाढलाविधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबरला मतदान होणार आहे.त्यामुळे प्रचारासाठी आता केवळ ७ दिवस शिल्लक आहे. त्यामुळे सभा, बैठका, पदयात्रा, रोड शोच्या माध्यमातून उमेदवार अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे चारही मतदारसंघात प्रचाराचा ज्वर वाढल्याचे चित्र आहे.कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरूनिवडणुकीत उमेदवारांची सर्वात मोठी ताकद आणि ऊर्जा ही कार्यकर्तेअसतात. आपल्या पक्षाचा उमेदवार कसा विजय होईल, मतांचे विभाजन झाल्यास आपल्या पक्षाच्या उमेदवाराला कशी मदत होईल, किती टक्के मते मिळतील याचे समीकरण याचे गणित आणि समीकरण जुळविण्याच्या कामात व्यस्त आहेत. आकडेमोड करुन आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा विजयाचा दावा करीत आहे.जुन्यांना साथ की नव्यांना संधीयंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जिल्ह्यातील चारही विद्यमान आमदारांनी संधी दिली आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गोपालदास अग्रवाल हे चौथ्यांदा विजयाचा इतिहास रचणार का? अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राजकुमार बडोले विजयाची हॅट्रीक साधणार हे सुध्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर तिरोडा आणि आमगाव मतदारसंघातील मतदार विद्यमान आमदारांना पुन्हा साथ देतात की नवीन चेहऱ्यांना संधी देतात याची सुध्दा उत्सुकता कायम आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया