शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री सडक योजनेतून निकृष्ट दर्जाचे बांधकाम

By admin | Updated: October 28, 2014 22:59 IST

सालेकसा तालुक्यातील तिरखेडी ते साकरीटोला - सातगाव रस्त्याचे बाधंकाम प्रधानमंत्री सडक योजनेंतर्गत सुरू आहे. सदर बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात आहे.

साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील तिरखेडी ते साकरीटोला - सातगाव रस्त्याचे बाधंकाम प्रधानमंत्री सडक योजनेंतर्गत सुरू आहे. सदर बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात आहे. यामुळे ठिकठिकाणी रस्ता उखडला असून वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. सदर कामात चांगल्या दर्जाचे साहित्य वापरून बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत गांधीटोलावासीयांनी केली आहे. प्राप्त माहितीनुसार, साकरीटोला ते सालेकसा मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने सदर मार्गाची दुर्दशा झाली होती. त्यामुळे या मार्गावर असणाऱ्या साकरीटोला, सातगाव, गांधीटोला, दुर्गटोला, गिरोला, भजीयादंड तसेच इतर गावातील नागरिकांना सालेकसा येथे तहसील कार्यालय तसेच पंचायत समितीच्या कामानिमित्त नेहमीच येणे-जाणे करावे लागते.परंतु सदर रस्त्याच्या दुर्दशेमुळे त्रास सहन करावा लागत होता. वाहन धारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत असे. सदर मार्ग दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी अनेकदा लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केली होती. त्यानुसार तिरखेडी ते साकरीटोला रस्त्याच्या कामाला पंतप्रधान सडक योजनेंतर्गत मंजुरी मिळाली व नुकतेच काम सुरू झाले. मात्र सदर कामात कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाची माती मिश्रीत खडी व मुरमाऐवजी पहाडीवरील मलब्याचा वापर केला जात असल्याने काम सुरू असतानाच ठिकठिकाणची गिट्टी उखडली आहे. त्यामुळे सदर मार्गावरून ये-जा करणे त्रासदायक ठरले आहे.सदर कत्राटंदार अंदाज पत्रकानुसार चांगल्या दर्जाच्या साहित्याचा वापर न करता मोठ्या प्रमाणात पैसे वाचविण्यासाठी निकृष्ट दर्जाच्या व कमी किमतीच्या साहित्यांचा वापर करून सदर मार्गाची ऐसीतैसी करीत आहे. जेव्हा की सदर मार्गावरून जवळच असलेल्या गांधीटोला, रूगांटोला, कडोतीटोला येथे चांगल्या दर्जाची खडी आणि पानगाव व कवडी येथे चांगल्या दर्जाचे मुरूम मोठ्या प्रमाणात उपल्बध आहे.असे असतानासुध्दा कंत्राटदार व संबंधित विभागाचे शाखा अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम सुरू आह. ग्रामपंचायत गांधीटोला येथील सरपंच तसेच पदाधिकारी व परिसरातील नागरिकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाच्या माध्यमातून काम बंद करा किंवा कामाता उत्तम दर्जाच्या साहित्याचा वापर करा, अशी मागणी केली आहे. सदर मार्गावरील बांधकामात चांगल्या दर्जाच्या साहित्याचा वापर न केल्यास काम बंद पाडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. (वार्ताहर)