शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जीवन प्राधीकरण तोट्यात

By admin | Updated: February 26, 2017 00:28 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) सध्याच्या सहा हजार ३५१ कर्मचाऱ्यांपैकी एक हजार ५५ कर्मचारी

भरपाईची आवश्यकता : वेतन व भत्त्याची समस्या गोंदिया : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) सध्याच्या सहा हजार ३५१ कर्मचाऱ्यांपैकी एक हजार ५५ कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनियुक्तीवर आहेत. कर्मचारी व प्रतिनियुक्त कर्मचारी यांच्या समायोजनानंतर कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ता व सेवानिवृत्तीवर राज्यात प्रतिमहिना २९.५४ कोटी रूपये खर्च केले जातात. अशा स्थितीत मजीप्रा दरमहिना २०.५४ कोटी रूपये व वार्षिक २४६.४८ कोटी रूपयांच्या तोट्यात चालत आहे. हा तोटा दूर करण्यासाठी मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी शासनासमोर जवळपास पाच हजार कोटी रूपये प्रतिवर्ष पेयजल व जल नि:सारण कार्यक्रम घेण्याची मागणी केली आहे. परंतु अनेक वर्षांपासून शासनाची दिशा प्राधिकरण व ग्राहकांच्या हिताच्या विपरित दिसून येत आहे. २२ नोव्हेंबर २०१२ रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची समिक्षा बैठक घेतली होती. त्यात मुख्यमंत्र्यांनी कृष्णा खोरे, विदर्भ, तापी, कोकण व गोदावरी-मराठवाडा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते यांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखविली होती. मजीप्राच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्याची जबाबदारी शासनाने सांभाळावी, अशी मंत्रिमंडळ टिप्पणी सादर करण्याचे निर्देश मजीप्राचे सदस्य सचिव यांना दिले. अनेकदा मंत्रिमंडळ टिप्पणी सादर करण्यात आली, परंतु प्रत्येकवेळी त्रुट्या काढून टिप्पणी परत पाठविण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या पाणी पुरवठा कार्यक्रमांना गती देण्यासाठी मजीप्रा लागून आहे. राज्य शासनाने ३१ आॅक्टोबर १९८१ पर्यंत मजीप्राच्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतन देण्याची जबाबदारी सांभाळली. यानंतर ही जबाबदारी मजीप्राकडे हस्तांतरीत करण्यात आली. मजीप्राच्या नितीनुसार, विविध योजनांवर प्रत्यक्ष खर्चाच्या हिशेबाने आस्थापना, यंत्र साहित्य यावर १७.५ टक्के ईएंडपी शुल्क वसूल करणे अनिवार्य आहे. ते मजीप्राच्या उत्पन्नाशी निगडीत बाब आहे. या शुल्कामुळे मजीप्राच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्याचा खर्च काढला जात आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्याच्या खर्चासाठी शासनाकडून कसलेही अनुदान मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व सेवानिवृत्तीचा खर्च काढणे कठिण जात आहे. (प्रतिनिधी) कर्मचाऱ्यांचे ५ पासून आंदोलन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात कार्यरत विविध कामगार संघटनांनी एकजुट होवून शासनाविरूद्ध तीव्र संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात १ ते ५ मार्चपर्यंत मजीप्राचे अधिकारी-कर्मचारी काळीफीत लावून काम करतील. ५ मार्चपासून बेमुदत राज्यस्तरीय आंदोलन सुरू करण्यात येईल. दरम्यान राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे-आंदोलन करण्यात येणार आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गोंदिया, कामठी व इतर अनेक ठिकाणी पाणी पुरवठा बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कर्मचारी संघटनेचे महासचिव निशिकांत ठोंबरे, मजीप्रा गोंदियाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके, प्रदीप वानखेडे, विकास दिवाळे, राजू खैरे, बंडू खापेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.