नऊ आयुर्वेदिक दवाखान्यांना चार वर्षापासून कुलूप

By Admin | Updated: February 12, 2016 02:07 IST2016-02-12T02:07:15+5:302016-02-12T02:07:15+5:30

जिल्ह्यात २७ आयुर्वेदिक दवाखाने व तीन आंग्ल रूग्णालय सुरू आहेत. मात्र १३ वने अंतर्गत असलेले तीन अ‍ॅलोपॅथिक ...

Locked nine Ayurvedic dispensaries for four years | नऊ आयुर्वेदिक दवाखान्यांना चार वर्षापासून कुलूप

नऊ आयुर्वेदिक दवाखान्यांना चार वर्षापासून कुलूप

निधी झाला बंद : जि.प.चा चालविण्यास नकार
गोंदिया : जिल्ह्यात २७ आयुर्वेदिक दवाखाने व तीन आंग्ल रूग्णालय सुरू आहेत. मात्र १३ वने अंतर्गत असलेले तीन अ‍ॅलोपॅथिक व सात आयुर्वेदिक असे नऊ रूग्णालय मागील तीन ते चार वर्षांपासून बंद आहेत. निधीअभावी बंद असलेल्या या दवाखान्यांना आपल्या खर्चाने चालविण्यास जिल्हा परिषदेने नकार दिला आहे.
जिल्ह्यातील सात आयुर्वेदिक दवाखाने व तीन आंग्ल दवाखाने बंद झाले आहेत. हे दवाखाने १३ वने या शिर्षांतर्गत सुरू होते. त्यांना वर्षाकाठी एक कोटी रूपयांची गरज होती. परंतु या शिर्षातंर्गत शासनाने निधी देणे बंद केल्यामुळे मागील अडीच ते तीन वर्षापासून हे दवाखाने बंद होते. गोंदिया तालुक्यातील मजीतपूर, पांगळी, गोरेगाव तालुक्यातील बोळुंदा, सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झाशीनगर, आमगाव तालुक्यातील अंजोरा ही सहा आयुर्वेदिक दवाखाने निधीअभावी बंद आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यातील गिरोला, डोंगरगाव व सुरतोली हे तीन दवाखाने बंद पडलेले आहेत. खोडशिवणी या आयुर्वेदिक दवाखान्यात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले आहे.
जिल्ह्यात २७ आयुर्वेदीक दवाखाने सुरू आहेत. त्यात गोंदिया तालुक्यातील बनाथर, बटाणा, अदासी, चुटीया, धापेवाडा व मुर्दाळा असे सहा आयुर्वेदीक दवाखान्यांचा समावेश आहे. गोरेगाव तालुक्यात घुमर्रा व तेढा येथे, आमगाव तालुक्यात शिवणी, ननसरी, गिरोला व कट्टीपार येथे, सालेकसा तालुक्यात पिपरीया, सोनपुरी, गांधीटोला येथे, देवरी तालुक्यात इडूकचुहा, डोंरगाव, पालांदूर, पुराडा येथे, सडक-अर्जुनी तालुक्यात मंदीटोला, कोसमतोंडी, बोपाबोडी, घाटबोरी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ईळदा, बाराभाटी, बोंडगावदेवी, इटखेडा तर तिरोडा तालुक्यात अर्जुनी, गांगला, मुरमाडी व सरांडी येथे आयुर्वेदीक दवाखाने सुरू आहेत. आंग्ल दवाखाना आमगाव तालुक्यात चिचटोला, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झरपडा व सडक-अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी येथे सुरू आहेत.

Web Title: Locked nine Ayurvedic dispensaries for four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.