शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

लाईफलाईन एक्स्प्रेस गोंदिया स्थानकावर दाखल

By admin | Updated: April 27, 2016 01:47 IST

बहुप्रतिक्षित लाईफलाईन एक्स्प्रेसचे गोंदिया रेल्वे स्थानकावर आगमन झाले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता....

विनामूल्य उपचार व शस्त्रक्रिया : ४ ते २५ मे पर्यंत मिळणार सेवागोंदिया : बहुप्रतिक्षित लाईफलाईन एक्स्प्रेसचे गोंदिया रेल्वे स्थानकावर आगमन झाले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते यांनी लाईफलाईन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू लोकांसाठी वरदान ठरणाऱ्या व वैद्यकीय क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या या सुसज्ज अशा लाईफ लाईन एक्स्प्रेसला २३ वर्षानंतर दुसऱ्यांचा गोंदियाला आणण्याचे कार्य जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, डॉ.अजय केवलीया, डॉ.रवि धकाते, डॉ.हरीश कळमकर यांनी केले आहे.वैद्यकीय सेवेने सुसज्ज अशा या चलित रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची चमू राहणार आहे. हे डॉक्टर्स डोळयांचे परिक्षण व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, फाटलेले ओठ व भाजलेल्या शरीरावरील परिक्षण तथा उपचार, शस्त्रक्रिया, कानावरील शस्त्रक्रिया, पोलिओ शस्त्रक्रिया, दातांचे परिक्षण व उपचार, मिर्गी तपासणी व उपचार, स्त्रीरोग उपचार आदी प्रकारच्या आजारांची तपासणी, उपचार व आवश्यकता असल्यास मोफत शस्त्रक्रिया करणार आहे. लाईफ लाईन एक्स्प्रेसची रु ग्णसेवा ४ ते २५ मे पर्यंत जिल्ह्यातील जनतेसाठी उपलब्ध राहणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या लाईफलाईन एक्स्प्रेसच्या रु ग्णसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)