शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत गटार योजनेचे काम जीवन प्राधिकरणाकडे

By admin | Updated: March 22, 2015 00:44 IST

गोंदिया शहरासाठी महत्वाकांक्षी अशा भूमिगत गटार योजनेला तीन वर्षांपूर्वी, म्हणजे ३१ मार्च २०१२ रोजी मंजुरी मिळाली आहे.

गोंदिया : गोंदिया शहरासाठी महत्वाकांक्षी अशा भूमिगत गटार योजनेला तीन वर्षांपूर्वी, म्हणजे ३१ मार्च २०१२ रोजी मंजुरी मिळाली आहे. मात्र हे काम कोणती यंत्रणा करेल याचा निर्णय अद्याप होऊ शकला नसल्यामुळे या कामाला सुरूवातच झाली नव्हती. अखेर हे काम गोंदिया नगर परिषदेऐवजी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने करावे, असा निर्णय राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने घेतला. त्याबाबतचा एक आदेश १८ मार्चला जारी करण्यात आला आहे. गोंदिया शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या योजनेच्या कामाला आता गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानाअंतर्गत गोंदिया नगर परिषदेच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या भूमिगत गटार योजनेसाठी ३१ मार्च २०१२ रोजी ८२.३३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या योजनेचे काम सुरू करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रथम हप्ता म्हणून अनुक्रमे ३२.९२ कोटी रुपये आणि ४.१८ कोटी रुपये गोंदिया नगर परिषदेकडे वर्गही करण्यात आले होते. नगर परिषदेच्या आमसभेत ६ आॅगस्ट २०१२ रोजी प्रस्ताव क्रमांक ०१ (ब) नुसार ही योजना नगर परिषदेच्या माध्यमातूनच पूर्ण करण्याचा प्रस्तावही पारित करण्यात आला होता. मात्र निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वीच नगर परिषदेने या योजनेचा सुधारित प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतासाठी सादर केला. केंद्र शासनाने १८ जून २०१३ ला गोंदिया नगर परिषदेच्या १२५.७२ कोटींच्या सुधारित भूमिगत गटार योजनेलाही मंजुरी दिली. मात्र या योजनेचे काम कोणत्या एजन्सीकडून केल्या जाईल, याबाबतच नगर परिषदेच्या वतीने कोणताच ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळेच निधीचा पहिला हप्ता जमा असूनही या योजनेच्या कामाला सुरूवात होऊ शकली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)दोन वर्षात पूर्ण करायची होती योजनावास्तविक पाहता भूमिगत गटार योजना मंजूर झाल्यानंतर दोन वर्षात पूर्ण करावयाची होती. मात्र योजना पूर्ण होणे तर दूर त्याच्या कामाची सुरूवातही तीन वर्षात झाली नाही. आपले हित जोपासून नगर परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी या योजनेचे काम नगर परिषदेकडूनच व्हावे असा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे नगर परिषदेकडून होणाऱ्या कामाचा दर्जा किती चांगला राहू शकतो यावरही शंका उपस्थित केल्या जात होत्या. दरम्यान तांत्रिक कर्मचारी-अधिकाऱ्यांचा अभाव असल्यामुळे नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने दि.१५ आॅक्टोबर २०१३ ला या योजनेचे काम जीवन प्राधीकरण किंवा इतर कोणत्या यंत्रणेकडे सोपविण्याची विनंती केली होती. मात्र यासंदर्भात शासनाकडून वारंवार पत्रव्यवहार होऊनही गोंदिया नगर परिषदेच्या आमसभेत हे काम महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडे सोपविण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पारित केला नाही. उलट २६ एप्रिल २०१४ च्या सभेतील प्रस्ताव क्रमांक १५ नुसार हे काम नगर परिषदेच्या माध्यमातूनच केले जाईल असे नगर परिषद प्रशासन संचालनालयाला कळविले. त्यानंतर २ मे २०१४ रोजी मुख्याधिकाऱ्यांनी न.प.प्रशासन संचालनालयाला पत्र लिहून नगर परिषद की आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्याची या योजनेचे काम शासनाने पूर्ण करून नंतर नगर परिषदेकडे सोपवावे असे कळविले. या टोलवाटोलवीतूनच हे काम रखडत गेले.करवसुली न.प.कडेच राहणारमहाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने १८ मार्चला आदेश काढून या योजनेच्या पूर्णत्वाची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे देण्यात आली. या योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पाची देखभाल, दुरूस्तीचा खर्च गोंदिया नगर परिषदेला शहरातील नागरिकांकडून मिळणाऱ्या टॅक्सच्या रुपाने वसून करून महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला देण्याचेही सदर आदेशात नमूद आहे.