शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

रूपया न देता ‘सर्वोत्तम घर बांधकाम’ मोहिमेचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 06:00 IST

सर्वांना हक्काचे पक्के घर या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी देशात प्रधानमंत्री आवास योजना शहर व ग्रामीण राबविली जात आहे. शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून ही योजना राबविली जात असून योजनेचा संपूर्ण कारभार नगर परिषद करीत आहे. चार घटकांतून राबविल्या जात असलेल्या या योजनेंतर्गत गोंदिया नगर परिषदेला सात हजार २२० आवासांचे टार्गेट देण्यात आले आहे.

ठळक मुद्देशासनाकडून पाठविण्यात आले पत्र : पत्रामुळे लाभार्थी संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : घरकुल बांधकामासाठी शासनाकडून एक रूपयाही मिळाला नसताना प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) विभागाकडून लाभार्थ्यांना ‘सर्वोत्तम घर बांधकाम’ मोहिमेचे पत्र पाठविले जात आहे. विशेष म्हणजे, घरकुल मंजूर झालेल्यांच्या यादीतील सर्वांनाच हे पत्र पाठविले जात असून यातून शासन लाभार्थ्यांची एकप्रकारे थट्टाच करीत असल्याच्या प्रतिक्रिया लाभार्थी व्यक्त करीत आहेत. शिवाय या पत्रामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.सर्वांना हक्काचे पक्के घर या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी देशात प्रधानमंत्री आवास योजना शहर व ग्रामीण राबविली जात आहे. शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून ही योजना राबविली जात असून योजनेचा संपूर्ण कारभार नगर परिषद करीत आहे. चार घटकांतून राबविल्या जात असलेल्या या योजनेंतर्गत गोंदिया नगर परिषदेला सात हजार २२० आवासांचे टार्गेट देण्यात आले आहे. मात्र नगर परिषदेच्या माध्यमातून सध्या ‘आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील वैयक्तीक स्वरूपात घरकुल बांधकामासाठी अनुदान’ या घटक क्रमांक-४ अंतर्गत घरकुल बांधकामांना मंजुरी दिली जात आहे.या घटकांतर्गत नगर परिषदेच्या ५१५ व ५२० अशा दोन सविस्तर प्रकल्प अहवालांना मंजुरी मिळाली आहे. यातील पहिल्या ५१५ लाभार्थ्यांच्या प्रकल्प अहवालातील सुमारे ३६० लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता, सुमारे ३०७ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला आहे. तर सुमारे १५५ लाभार्थ्यांना अद्याप एकही रूपया देण्यात आलेला नाही. असे असतानाही, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) विभागाकडून मात्र सर्वच लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम पूर्ण झाले असावे असे गृहीत धरून ‘सर्वोत्तम घर बांधकाम’ मोहिमेचे पत्र पाठविले जात आहे.एक रूपयाही मिळाला नसताना लाभार्थी घराचे बांधकाम कसे पूर्ण करू शकेल असा प्रश्न येथे उपस्थित होतो. वास्तविक, घरकुल मंजुरीच्या यादीत नाव आल्याने कित्येकांनी आता अनुदान मिळणार या आशेतून घर उघडून टाकले आहे. मात्र अनुदान मिळाले नसल्याने ते उघड्यावर आले आहेत. अशात मात्र यादीत घरकुल बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांची यादी न मागविता शासनाकडून थेट यादीतील सर्वांनाच पत्र पाठविले जात आहे. या प्रकारामुळे लाभार्थ्यांत चांगलाच रोष निर्माण झाला असून शासन आमची थट्टा करीत आहे अशा प्रतिक्रीया व्यक्त करीत आहेत.काय आहे ‘सर्वोत्तम घर बांधकाम’ योजनाप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पीएमवाय (यू) अवॉर्ड -२०१९ योजनेंतर्गत ‘सर्वोत्तम घर बांधकाम’ शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण बांधकाम झालेल्या घरांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. याकरीता योजनाचा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करून लाभार्थीला कुटुंबासह घराचे फोटे अपलोड करावयाचे आहे.अनुदानाला घेऊन लाभार्थी संभ्रमातविभागाकडून लाभार्थ्यांना ‘सर्वोत्तम घर बांधकाम’ मोहिमेबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. अशात लाभार्थी मात्र संभ्रमात अडकले आहेत. शासनाने पत्र पाठवून घर बांधकाम झाल्याचे कळविले असे त्यांना वाटत आहे. अशात आता आम्हाला पैसे मिळणार की नाही असेही त्यांना वाटू लागले आहे. संबंधित विभागाकडून सर्वांनाच हे पत्र पाठविण्यात आले असल्याचे सांगूनही त्यांना मात्र धडकी भरली आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना