लाईफलाईन एक्स्प्रेसच्या आरोग्य सेवेचा आज शुभारंभ

By Admin | Updated: May 4, 2016 02:57 IST2016-05-04T02:57:10+5:302016-05-04T02:57:10+5:30

जिल्ह्यातील गरजू व गोरगरीब रु ग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा या दृष्टीने क्युरादेव फार्मा प्रा.लि.च्या सौजन्याने राज्य

Launch of Lifestyle Express's health service today | लाईफलाईन एक्स्प्रेसच्या आरोग्य सेवेचा आज शुभारंभ

लाईफलाईन एक्स्प्रेसच्या आरोग्य सेवेचा आज शुभारंभ

गोंदिया : जिल्ह्यातील गरजू व गोरगरीब रु ग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा या दृष्टीने क्युरादेव फार्मा प्रा.लि.च्या सौजन्याने राज्य सरकारच्या मदतीने आणि इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनद्वारा संचालित लाईफ लाईन एक्स्प्रेस या जगातील पहिल्या चालत्या-फिरत्या आरोग्य सेवेचा शुभारंभ बुधवारी ४ मे रोजी सकाळी ९ वाजता पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार आहे. लोकोशेड, रेल्वे स्टेशन पोस्ट आॅफिसजवळ, येथे हा कार्यक्रम होणार आहे.
अध्यक्षस्थानी लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ.गोपालदास अग्रवाल तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार तसेच नागपूर आरोग्य मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूरच्या प्राचार्या डॉ. पदमजा जोगेवार तसेच क्युरादेव फार्मा प्रा.लि.चे सहायक महाव्यवस्थापक अशोक बियाणी, इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ.वैभव धाडकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
४ ते २५ मे या कालावधीत लाईफ लाईन एक्स्प्रेसच्या आरोग्य सेवेदरम्यान रु ग्णांची प्राथमिक तपासणी केटीएस जिल्हा सामान्य रु ग्णालयात करण्यात येणार आहे. रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्यास केटीएसमधून वातानुकूलित रुग्णवाहिकेतून लाईफ लाईन एक्स्प्रेसमध्ये रुग्णास आणण्यात येईल.
रुग्ण व रुग्णाच्या एका नातेवाईकाची भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. लाईफ लाईन एक्स्प्रेसमध्ये डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, फाटलेले ओठ व भाजलेल्या शरीराच्या भागाची, कानाच्या रु ग्णांवर तसेच १४ वर्षाच्या आतील पोलिओ रु ग्णांवर शस्त्रिक्र या करण्यात येईल. तर दातांचे विकार, मिर्गी (फिट) व स्त्रीरोगावर उपचार करण्यात येतील. यामध्ये नामवंत डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करु न रोगनिदान, मोफत उपचार व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करतील. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Launch of Lifestyle Express's health service today