शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत २७ बंधाऱ्यांची कामे पूर्ण

By admin | Updated: December 29, 2014 01:44 IST

पाण्याची सुविधा नसल्याने एका पावसाअभावीसुद्धा धान पिकाचे उत्पन्न नाहिसे होत होते. शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम हाती घेतला. यापूर्वी गतिमान योजना होती.

काचेवानी : पाण्याची सुविधा नसल्याने एका पावसाअभावीसुद्धा धान पिकाचे उत्पन्न नाहिसे होत होते. शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम हाती घेतला. यापूर्वी गतिमान योजना होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा मिळाला आहे. तिरोडा तालुक्यात कृषी विभागाने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत २३ बंधारे व गतिमान योजनेतून चार बंधारे १ कोटी ५२ लाख रूपये खर्चून तयार केली आहेत. यातून २७५ हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे.तालुका कृषी विभागांतर्गत दोन मंडळ आहेत. सर्वाधिक तिरोडा मंडळ कृषी विभागात सिमेंट बंधारे तयार करण्यात आले आहेत. तिरोडा मंडळांतर्गत सन २०११-१२ मध्ये बेरडीपार व डब्बेटोला येथे पाच बंधारे २६ लाखांच्या खर्चाने तयार करण्यात आले. आलेझरी येथे चार बंधारे १८ लाखांच्या खर्चाने, गोंडमोहाळी येथे तीन बंधारे १८ लाखांच्या खर्चाने, गतिमान योजनेंतर्गत मुंडीकोटा येथे चार बंधारे १६ लाख रूपयांच्या खर्चाने तयार करण्यात आलीत. या १६ बंधाऱ्यांवर ६८ लाख रूपये खर्च करण्यात आले. त्याद्वारे १८२ हेक्टर क्षेत्राला पाण्याचा लाभ होणार आहे. सन २०१२-१३ मध्ये गोंडमोहाडी येथे २८ लाख रूपये खर्चून चार बंधारे तयार करण्यात आले. येथील पाण्याचा लाभ ४२ हेक्टर क्षेत्राला मिळत आहे. सन २०१३-१४ मध्ये एकूण सात बंधारे तयार करण्यात आले. यात गोंडमोहाडी, इंदोरा व मेंढा येथे प्रत्येकी दोन बंधारे तयार करण्यात आले. त्यासाठी ४८ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. तसेच खडकी येथे आठ लाख रूपये खर्चून एक बंधारा तयार करण्यात आला आहे. यावर्षी सात बंधाऱ्यांसाठी ५६ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. या सात बंधाऱ्यांतून ४२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाला लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.तीन वर्षांत तिरोडा कृषी विभागाने एकूण २७ बंधाऱ्यांची कामे पूर्ण केली असून त्यासाठी एक कोटी ५२ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे २७५ हेक्टर क्षेत्राला पाण्याच्या सिंचनाचा लाभ होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत व गतिमान योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांपासून शेतपिकांसह गुरांना पाणी पिण्याची सोय उपलब्ध झाली आहे. नागरिकांना तसेच महिलांना कपडे धुण्यासाठी व घरगुती उपयोगासाठी पाण्याच्या सुविधेचे साधन म्हणून उपयोगी ठरणार आहेत. बंधाऱ्यात पाण्याचे साठवण राहिल्याने परिसरातीलच नव्हे तर १० ते १५ किमी दूरपर्यंत पाण्याच्या पातळीत सुधारणा होणार आहे. (वार्ताहर)