शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियातील २५०० पट्टेधारक होणार जमिनीचे मालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 06:00 IST

नझुलच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना दर ३० वर्षाने नझुल जमिनीच्या लीज पट्याचे नुतनीकरण करणे आवश्यक असते. परंतु आतापर्यंत अनेक लोकांनी नुतनीकरण करणे बंद केले आहे. अशा लोकांसाठी २३ ते ३० डिसेंबर दरम्यान उपविभागीय अधिकारी, अप्पर तहसीलदार कार्यालय व भूमी अभिलेख विभागाकडून संयुक्त रूपाने एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देशासनाला मिळणार १५ कोटीचा महसूल : ५० ते ६० हजारात मालकी हक्क

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दर ३० वर्षाने नझुल जमिनीच्या लीज पट्याचे नुतनीकरण करणे आवश्यक असते. आता शासनाने नझुलच्या जमिनीवर ज्याचे अतिक्रमण आहे. त्यांना मालकी हक्क देण्याचा निर्णय घेतला आहे. ५० ते ६० हजार रूपयात आता नझुलच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना मालकी हक्क मिळेल. असा हक्क गोंदिया शहरातील २५०० पट्टेधारकांना मिळणार आहे.नझुलच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना दर ३० वर्षाने नझुल जमिनीच्या लीज पट्याचे नुतनीकरण करणे आवश्यक असते. परंतु आतापर्यंत अनेक लोकांनी नुतनीकरण करणे बंद केले आहे. अशा लोकांसाठी २३ ते ३० डिसेंबर दरम्यान उपविभागीय अधिकारी, अप्पर तहसीलदार कार्यालय व भूमी अभिलेख विभागाकडून संयुक्त रूपाने एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शहरात ३२ नझुल सीट तयार करण्यात आल्या आहेत. यातील १६ क्रमांकाच्या सीटमधील अतिक्रमण धारकांना नोटीस पाठविण्यात आले होते. परंतु शिबिरात फक्त १४ लोकांनी आपल्या लीजचे पट्टे नुतनीकरणासाठी अर्ज लावले होते. सन २०१० ते २०१४ साठी सदर जमीन लीजवर देण्याची तरतूद करण्यात येत आहे. सन २०१० नंतर १० वर्ष झाल्यानंतर बहुतांश लोक लीजवर घेतलेल्या जमिनीचे नुतनीकरण करण्यासाठी तयार झाले नाही. जमीन लीजवर दिल्यानंतर शासनाला महसूल मोठ्या प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे ज्या लोकांना जमीन लीजवर दिली त्या भूमिधारीला भूस्वामी करण्याचा निर्णय घेण्यात आला.आतापर्यंत शहरातील १० ते १२ लोकांना भूमीस्वामी करण्यात आले आहे. या प्रक्रियेला पुढे वाढविण्याची प्रक्रिया सुरू आहे. याचा लाभ हजारो लोकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे हा लाभ घेणारे व्यापारी वर्गातील लोक असणार आहेत. शहरात जी नझुलची जमीन आहे त्या ठिकाणी मुख्य बाजार आहे.रेडिरेकनरने मागील २-३ वर्षात जमिनीच्या किंमतीत वाढ न झाल्यास एका पट्याच्या मागे शासनाला ५० ते ६० हजार रूपये महसूल मिळणार आहे. ६० हजार रूपयाच्या हिशोबाने सरकारी तिजोरीत २५०० पट्टेधारकांचे १५ कोटी रूपये जमा होतील. परंतु रेडिरेकनरने जमिनीच्या किंमतीत वाढ केल्यास शासकीय तिजोरीत अधिक रक्कम गोळा होऊ शकते. परंतु शासकीय जमिनीचे मालक व्हावे किंवा नाही हे त्या लीज धारकावर अवलंबून असते.