शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाराचे ज्ञान असणे आवश्यक

By admin | Updated: October 9, 2015 02:11 IST

कार्यालयीन कामकाजात परदर्शिता यावी, यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम पारित करण्यात आले.

जिल्हाधिकारी सूर्यवंशी : अधिकाऱ्यांना माहिती अधिकार प्रशिक्षण गोंदिया : कार्यालयीन कामकाजात परदर्शिता यावी, यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम पारित करण्यात आले. याद्वारे सामान्य नागरिक कामकाजाची संपूर्ण माहिती मागू शकते. करिता कार्यालयीन कामकाजासाठी माहितीच्या अधिकाराचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्तवतीने तलाठी तथा सहायक जनमाहिती अधिकारी यांच्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित दोन दिवसीय माहिती अधिकार प्रशिक्षणाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. सर्वसामान्य नागरिकांना माहितीचा अधिकार अभिनियम २००५ अंतर्गत कार्यालयीन माहिती प्राप्त करता येते. ही माहिती नागरिकांना उपलब्ध करुन देतेवेळी संबंधित अधिकाऱ्यांना अडचणी येऊन नये व योग्य ती माहिती देता यावी याकरीता या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी एन.के. लोणकर, अधीक्षक जी.डी. किरीमकर, प्रशिक्षणाच्या संयोजिका आशा तागडे, प्रकल्प अधिकारी सतीश पाटील, मार्गदर्शक अ‍ॅड. भूषण हिरोळे, प्रदिप देशमुख व यशदाचे समन्वयक नितीन राऊत उपस्थित होते.अ‍ॅड. हिरोळे व देशमुख यांनी, जास्तीत जास्त माहिती खुली व अद्ययावत होण्याच्या दृष्टिने माहितीच्या अधिकाराची भूमिका यावर विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. माहितीचा अधिकार कायद्याचा इतिहास, स्वरुप, समुचित शासन व प्राधिकरणाच्या जबाबदाऱ्या, स्वयंप्रेरणेने प्रकटन करावयाची माहिती, जन माहिती अधिकारी व प्रथम अपीलीय अधिकारी यांची कर्तव्य, जबाबदाऱ्या, पत्रव्यवहार, नमुने व निकाल पत्र या विषयांवर मार्गदर्शन केले.प्रास्ताविक सतीश पाटील यांनी मांडले. प्रशिक्षणार्थ्यांना माहिती अधिकाराची मार्गदर्शन पुस्तिका देण्यात आली. प्रशिक्षणाला मोठ्या संख्येने तलाठी, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)