महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदियापर्यंतच ठेवा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST2021-06-23T04:20:03+5:302021-06-23T04:20:03+5:30

गोंदिया : महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदियाकरांचा जीव असून, तिचा रिवापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय रद्द करून ही गाडी गोंदियापर्यंतच ठेवण्यात यावी, ...

Keep Maharashtra Express up to Gondia () | महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदियापर्यंतच ठेवा ()

महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदियापर्यंतच ठेवा ()

गोंदिया : महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदियाकरांचा जीव असून, तिचा रिवापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय रद्द करून ही गाडी गोंदियापर्यंतच ठेवण्यात यावी, अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीने केली आहे. यासाठी समितीच्यावतीने खासदार प्रफुल्ल पटेल यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र एक्स्प्रेस कोल्हापूर ते गोंदिया दरम्यान धावते. ही गाडी गोंदियाकरांकरिता महत्त्वाची असून, गोंदियाच्या हक्काची आणि अस्मितेचा प्रतीक आहे; मात्र ही गाडी गोंदियाकरांकडून हिरावून तिचा विस्तार रिवापर्यंत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ही गाडी गोंदियावरूनच सोडण्यात यावी, अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीने केली आहे. त्याकरिता समितीने खा. प्रफुल्ल पटेल यांना निवेदन दिले आहे. गोंदियाकरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या मुद्द्याला घेऊन केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन खासदार पटेल यांनी दिले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सूरज नशिने, दिव्या भगत-पारधी, हरीश अग्रवाल, लक्ष्मण लधानी, राजेंद्र कावडे, अकील नायक, स्मिता शरणागत, भेरूमल गोपलानी यांचा समावेश होता.

Web Title: Keep Maharashtra Express up to Gondia ()