शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

कटंगीतील धनकचरा प्रकल्पाची जागा वांद्यात

By admin | Updated: November 18, 2014 22:57 IST

जवळील ग्राम कटंगी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी असलेली प्रस्तावित जागा वांद्यात आली आहे. विमान प्राधीकरणने या जागेवर आक्षेप घेतल्याने नगर परिषदेची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढली आहे.

विमान प्राधीकरणाचा आक्षेप : रापेवाडा येथे जागेची पाहणीकपिल केकत - गोंदियाजवळील ग्राम कटंगी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी असलेली प्रस्तावित जागा वांद्यात आली आहे. विमान प्राधीकरणने या जागेवर आक्षेप घेतल्याने नगर परिषदेची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढली आहे. परिणामी गोंयिा नगर पालिका आता रापेवाडा गावातील जागेची पाहणी करीत आहेत. यासाठी पालिकेकडून आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. शहरात निघणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नगर परिषदेकडे व्यवस्थापन प्रकल्प असणे गरजेचे आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत एक समिती कार्यरत असते. मात्र या प्रकल्पासाठी लागणारी जागा पालिकेकडे नसल्याने पालिका मागील दोन वर्षांपासून जवळील ग्राम कटंगी येथील एका जागेवर शहरात निघणारा घन कचरा टाकत आहे. याच जागेवर हा प्रकल्प उभारण्यात यावा यासाठी पालिकेचे प्रयत्नही सुरू होते. मात्र मध्यंतरी घेण्यात आलेल्या घन कचरा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत विमान प्राधीकरण बिरसी विमानतळचे प्रबंधक अवधेषकुमार यादव यांनी कटंगीची ही जागा बिरसी विमानतळापासून १० किमी. अंतराच्या आत येत असल्याने त्याला विमान प्राधीकरण नियमानुसार परवानगी देता येणार नाही असे स्पष्ट केले. शिवाय अन्य काही कारणांना घेऊनही ही जागा प्रकल्पासाठी उपयुक्त नसल्याचे निर्दशनास आले. समितीतील या चर्चेनंतर जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना प्रकल्पासाठी अन्य जागा शोधण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नगर परिषदेने जवळील ग्राम रापेवाडा येथील गट क्रमांक ६४३ मधील एक जागा बघितली आहे. बघण्यात आलेल्या जागेतील १० एकर जागा प्रकल्पाला मिळावी यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू असून यासंबंधात कारवाई सुरू आहे. विशेष म्हणजे प्रकल्पासाठी जागाच मिळत नसल्याने पालिकेचे धन कचरा व्यवस्थापन प्रकल्प अद्याप साकारलेले नाही. कटंगी मधील जागेत कचरा टाकणे सुरू करण्यापूर्वी जवळील ग्राम टेमनी येथे पालिका कचरा टाकत होती. मात्र तेथील नागरिकांनी यास विरोध केल्याने तेथूनही पालिकेला माघार घ्यावी लागली होती. त्याता आता कटंगीची जागा हातून गेल्याने पालिकेची डोकेदुखी आणखीणच वाढली आहे. अशात सध्याच्या स्थितीत पालिकेला श्मशान भुमिच्या मागील जागेत कचरा टाकावा लागत आहे. पालिकेकडून सध्या रापेवाडा येथील जागा मिळावी यासाठी कार्यवाही केली जात आहे.