शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
5
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
6
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
7
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
8
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
9
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
10
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
11
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
12
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
13
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
14
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
15
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
16
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
17
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
18
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
19
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
20
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

करटी बु. नळयोजनेत लाखोंचा भ्रष्टाचार उघड

By admin | Updated: October 20, 2014 23:15 IST

जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागांतर्गत करटी बु. येथे नवीन नळ योजनेसाठी ८९ लाख ४४ हजार २०० मंजूर करण्यात आले. लोकवर्गणी ४ लाख ५० हजार दाखविण्यात आली. लोकवर्गणी ज्या नागरिकांच्या

परसवाडा : जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागांतर्गत करटी बु. येथे नवीन नळ योजनेसाठी ८९ लाख ४४ हजार २०० मंजूर करण्यात आले. लोकवर्गणी ४ लाख ५० हजार दाखविण्यात आली. लोकवर्गणी ज्या नागरिकांच्या नावे दाखविण्यात आली, त्यांनी एक ही रुपया दिला नाही. त्यांना जाणीवही नाही. यात बाहेरगावी राहणारे व शासकीय नोकरीत असणाऱ्या लोकांची नावे असल्याची माहितीच्या अधिकारात उघडकीस आली आहे. यात ३० लोकांनी ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागांतर्गत लोकवर्गणी, कसल्याही प्रकारचे पैसे व सहीसुद्धा दिली नाही. नमुना सातवर नागरिकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या ग्रामसेवक महाकालकर यांनीच केल्या. अंदाजपत्रकात नवीन विहिरी मंजूर असून जुन्या विहिरीलाच रिपेअरिंग करून त्याच विहिरीचे बिल काढण्यात आले. पाईपलाईनमध्येही निकृष्ट दर्जाचे पाईप टाकण्यात आले आहेत. नळ योजनेसाठी ग्राम पाणी पुरवठा, स्वच्छता पर्यावरण समिती ग्रामसभेव्दारे तयार करणे व त्यात ५० टक्के महिला असणे आवश्यक आहे. पण ग्रामसभेचा विचार न घेता तहकुब सभेत व गावातील नागरिकांना याची जाणीव न करता समिती गठीत करण्यात आली. यात अध्यक्ष सरपंच व सचिव ग्रामसेवक असते. पाणी पुरवठा समिती कधी गठित करण्यात आली. यावर नागरिकांनी आक्षेपही घेतला. तरीसुद्धा पैसे काढण्यात आले. यात २५ जून २०१४ रोजी पहिला हप्ता ७ लाख ४० हजार रूपये, दुसरा हप्ता १८ जून २०१४ रोजी १७ लाख रुपये, तिसरा हप्ता तीन लाख रुपये असे एकूण २७ लाख ५० हजार रुपये योजनेवर मिळाले व खर्चही झाले आहे. याबाबतची विचारणा ग्रामसेवक महाकालकर यांना रंजीत बागळे यांनी केले असता, समाधानकारक उत्तर न देता तुम्हाला वाटेल ते करा, उलटपुलट कामे करावीच लागतात. खोटे काम केल्याशिवाय काम होत नाही, असे ग्रामसेवकाने स्पष्ट सांगितले. तसेच अधिकाऱ्यांना, कनिष्ठ अभियंता, जि.प. सदस्य यांनाही पैसे द्यावे लागतात. जि.प. सदस्य व सरपंच कपूर पटले यांच्या मार्गदर्शनातील काम आहे. मी काय करणार? असे बागळे यांना ठणकावून सांगितले. सदर काम विजय रहांगडाले यांच्या नावाने असून काम ठाणेगाव येथील खोब्रागडे पेटी कंत्राटदार करीत आहे. याची तक्रार मुख्य कार्यपालन अधिकारी व वरिष्ठांना करण्यात आली आहे. या नवीन नळ योजनेकडे गावातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. या सर्व बाबी माहितीच्या अधिकारात करटी बु. येथील सामाजिक युवा कार्यकर्ते रंजीत बागळे यांनी उघडकीस आणली आहे. (वार्ताहर)