शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी विधवेला न्यायमंचचा दिलासा

By admin | Updated: March 21, 2015 01:59 IST

सर्पदंशाने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचा रासायनिक विश्लेषण अहवाल नसल्यामुळे शेतकरी व्यक्तीगत अपघात विम्याचा दावा फेटाळणाऱ्या न्यू इंडिया विमा ..

गोंदिया : सर्पदंशाने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचा रासायनिक विश्लेषण अहवाल नसल्यामुळे शेतकरी व्यक्तीगत अपघात विम्याचा दावा फेटाळणाऱ्या न्यू इंडिया विमा कंपनीला ग्राहक न्यायमंचाने चांगलाच झटका दिला. एक लाख रूपये विमा रकमेसह नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश सदर कंपनीला न्यायमंचाने दिला आहे.शांता राजेंद्र घासले रा. रेंगेपार ता. सडक-अर्जुनी असे तक्रारकर्तीचे नाव आहे. तिचे पती राजेंद्र मोहन घासले यांचा मृत्यू १६ आॅक्टोबर २०११ रोजी शेतात विषारी साप चावल्याने झाला. त्यामुळे तिने संपूर्ण कागदपत्रांसह न्यू इंडिया विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक, क्षेत्रीय व्यवस्थापक व सडक-अर्जुनीचे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे विमा प्रस्ताव सादर केला. विमा कंपनीने पत्र पाठवून मृतकाच्या रासायनिक विश्लेषण अहवालाची मागणी केली. तसेच तो अहवाल लवकर उपलब्ध न झाल्याने दावा फेटाळला. त्यामुळे शांताने ग्राहक न्यायमंचात धाव घेतली. सदर प्रकरणात गणपूर्ती म्हूणन न्यायमंचाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य वर्षा पाटील यांची उपस्थिती होती.न्यायमंचाने तक्रार दाखल करून विरूद्ध पक्षांना नोटिस पाठविल्या. विमा कंपनीच्या व्यवस्थापकांनी हजर होवून आपला जबाब नोंदविला. पण तालुका कृषी अधिकारी अनुपस्थित असल्याने प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला. विमा कंपनीने आपल्या जबाबात, तक्रारकर्तीने मृतक पतीचा रासायनिक विश्लेषण अहवाल सादर केला नाही. तसेच मृत्यूचे कारणही कुठेच रेकार्डवर नसल्यामुळे दावा खारिज करण्याची मागणी केली. यावर तक्रारकर्तीकडून अ‍ॅड. उदय क्षिरसागर यांनी युक्तिवाद केला. सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे कारण उत्तरीय तपासणी अहवालात नमूद नसले तरी पोलीस चौकशी दस्तावेज व पोलीस पाटील यांच्या प्रमाणपत्रांवरून तो सर्पदंशाने मरण पावल्याचे स्पष्ट नमूद आहे. असे असतानाही रासायनिक विश्लेषण अहवालाची मागणी करणे गैर आहे. तसेच दावा विहीत मुदतीत असून मृत्यूवेळी विमा संरक्षण लागू होते. विमा कंपनीने सेवेत त्रुटी केली म्हणून तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यास पात्र असल्याचे सांगितले. तर विमा कंपनीकडून अ‍ॅड. इंदिरा बघेले यांनी युक्तिवाद करून रासायनिक अहवाल, एफआयआर, पोलीस अहवाल, पंचनामा, फोरेंसिक लॅब रिपोर्ट, उत्तरीय तपासणी अहवाल आदी दस्तऐवज तसेच मृत्यूचे कारण कुठेही आले नसल्याने तक्रार खारिज करण्याची मागणी केली. यावर न्यायमंचाने कारणमिमांसा केली. राजेंद्र घासले यांचा मृत्यू सर्पदंशाने उपचारादरम्यान झाला. त्यांच्या नावे शेतजमीन असल्याने ते अपघात विम्याचे लाभधारक आहेत. रासायनिक अहवाल व मृत्यूच्या कारणाविषयी कुठलेही दस्तऐवज नसल्यामुळे विमा कंपनीने दावा फेटाळला. परंतु पोलीस चौकशी अहवालात राजेंद्र यांना १६ आॅक्टोबर २०११ रोजी सर्पदंश झाला. नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान २७ आॅक्टोबर २०११ रोजी सायंकाळी ६.३० वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद आहे. शिवाय अ‍ॅड. क्षिरसागर यांनी राज्य आयोगाचे न्यायनिवाडे सदर प्रकरणात सादर केले. यावरून न्यायमंचाने शांता घासले यांची तक्रार मान्य केली. मृतक पतीच्या अपघात विम्याची रक्कम एक लाख रूपये १७ जानेवारी २०१२ पासून दरसाल दरशेकडा नऊ टक्के व्याजाने द्यावे, शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसान भरपाई १० हजार रूपये, तक्रारीचा खर्च पाच हजार रूपये आदेशाची पत्र मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश न्यायमंचाने सदर विमा कंपनीला दिला. (प्रतिनिधी)