जय श्री राम : बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुढीपाडव्यानिमित्त गोंदिया शहरात उत्साहात श्रीरामाच्या मूर्तीची मिरवणूक काढून नऊ दिवसांकरिता नेहरू चौकात स्थापना करण्यात आली. हनुमान चौकातून वाजत गाजत निघालेली ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने फिरून नेहरू चौकात विसर्जित करण्यात आली. सिंधी बांधवांचा चेट्रीचंड उत्सव आणि श्रीराम मूर्तीची मिरवणूक यामुळे शहरात भक्तीमय वातावरण होते.
जय श्री राम :
By admin | Updated: April 9, 2016 02:02 IST