शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

विद्युतचा अनियमित पुरवठा; कृषी पंप जळाले

By admin | Updated: May 7, 2015 00:35 IST

सिहोरा परिसरात विजेचा अल्प तथा अधिक दाबाचा पुरवठा सुरु झाला आहे.

धानाचे पीक अडचणीत नळ योजनाही प्रभावित कुलर पंखे बंद चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात विजेचा अल्प तथा अधिक दाबाचा पुरवठा सुरु झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कृषी पंप जळण्यास सुरुवात झाली असून उन्हाळी धानाचे पीक अडचणीत आले आहे.वैनगंगा बावनथडी नद्यांच्या खोऱ्यात असलेल्या सिहोरा परिसरात यंदा उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी अभावी चांदपुर जलाशयाचे पाणी वाटप करण्यात आले नाही. यामुळे २ हजार हेक्टर आर शेतीत धानाची लागवड झाली नाही. मात्र कृषी पंपधारक शेतकऱ्यांनी धानाची लागवड केली आहे. या शिवाय वैनगंगा नदी पात्रात पाणीच पाणी असल्याने नदी काठालगत शेतकऱ्यांनी कृषी पंपाने पाण्याचा उपसा करण्यास सुरुवात केली आहे. या परिसरात थ्री फेज व सिंगल फेज असा विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. २४ तास घरगुती शेतकऱ्यांना थ्री फेज विज पुरवठा ८ तास करण्यात येत आहे. रात्री १२ वाजेच्या सुमारास थ्री फेज विज पुरवठा सुरु होत आहे. या विज पुरवठ्यात अल्प तथा अधिक वाढता दाब असल्याने शेतकऱ्यांचे कृषी पंप जळत आहेत. गेल्या आठवड्यात कृषी पंप जळाल्याचा आकडा ३० च्या घरात गेला आहे. एकच कृषी पंप दोनदा जळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी पंप दुरुस्तीचा भुर्दंड या शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे उन्हाळी धानपिक अडचणीत आलेला आहेत.कृषी पंप दुरुस्ती करिता दुकानात शेतकऱ्यांची गर्दी सुरु झाली आहे. थ्री फेज विज पुरवठा मध्यरात्री सुरु करण्यात येत असल्याने शेतकऱ्यात शेतात ये-जा करण्यास भिति निर्माण होत आहे. जग झोपला असतांना देशांचा पोशिंदा शेतकरी मात्र रात्र जागुन काढत आहे. हा चिंतेचा विषय आहे. या परिसरात वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली असून शेत शिवारात रानडुकराचे वास्तव्य शेतकऱ्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. सिहोरा परिसरात अल्प तथा अधिक दाबाचा विजेचा पुरवठा होत असून सिंंगल आणि थ्री फेज विज पुरवठयात शेतकरी अडचणीत आला आहे. एक ना धड भाराभर चिंधा अवस्था झाली असून रोज २ कृषी पंप जळत आहेत. -रेखा सोनवाने, सरपंच चुल्हाड.सिंगल आणि थ्री फेज विज पुरवठ्याचा फटका नळ योजनांना बसत आहे. नळ योजनाचे पंप जळत असल्याने गावात पाणी टंचाईचा सामना संभाव्य जनतेला करावा लागत आहे. -नेहा पटले, अध्यक्ष, महिला मंडळ चुल्हाड.सिंगल फेज विज पुरवठयामुळे कुलर, पंखे शोभोची वास्तु ठरत आहेत. अनेक गावात विज दाबाची समस्या असून थ्री फेज विज पुरवठ्याची गरज आहे. -अंजली पारधी, गृहिणी वारपिंडकेपार.