जिल्हा परिषदमध्ये निघतात प्रतिनियुक्तीचे नियमबाह्य आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:00 AM2020-07-14T05:00:00+5:302020-07-14T05:00:37+5:30

जिल्हा परिषदेतील काही अधिकारी आपल्या सोयीने कामकाज करतात.त्यातच काहींच्या कार्यप्रणालीचा अंदाज नसताना त्या कर्मचाऱ्यांवर जि.प.मेहरबान आहे. माध्यमिक शाळामंधील काही मुख्याध्यापकांसह शिक्षकांना आपल्या सेवानिवृत्तीनंतरची रक्कम निव्वळ एका कर्मचाऱ्याच्या हव्यासापोटी एका खासगी कंपनीच्या विम्यात टाकावी लागली.

Irregular orders of deputation are issued in Zilla Parishad | जिल्हा परिषदमध्ये निघतात प्रतिनियुक्तीचे नियमबाह्य आदेश

जिल्हा परिषदमध्ये निघतात प्रतिनियुक्तीचे नियमबाह्य आदेश

Next
ठळक मुद्देहात ओले झाल्याची चर्चा : पदोन्नती होताच प्रतिनियुक्तीवर बोलाविले

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आयएसओचे स्वप्न पाहणाऱ्या जिल्हा परिषदेचा कारभार मागील काही महिन्यांपासून पूर्णपणे ढिसाळ झाला आहे. मिनी मंत्रालयात काम करणारे अधिकारी आपल्या सोयीनुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती व सोयीनुसार प्रतिनियुक्ती देत असल्याचे प्रकार उघडकी येत आहे. वर्षानुवर्षे जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पदोन्नती देण्यात आली. परंतु लगेच त्याला पुन्हा प्रतिनियुक्तीवर जिल्हा परिषदेत पदस्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
जिल्हा परिषदेतील काही अधिकारी आपल्या सोयीने कामकाज करतात.त्यातच काहींच्या कार्यप्रणालीचा अंदाज नसताना त्या कर्मचाऱ्यांवर जि.प.मेहरबान आहे. माध्यमिक शाळामंधील काही मुख्याध्यापकांसह शिक्षकांना आपल्या सेवानिवृत्तीनंतरची रक्कम निव्वळ एका कर्मचाऱ्याच्या हव्यासापोटी एका खासगी कंपनीच्या विम्यात टाकावी लागली. तरीही त्या कर्मचाऱ्यावर माध्यमिक शिक्षण विभागाची नजर जात नाही. माध्यमिक शिक्षण विभागाचा मोह न सोडणाºया या कर्मचाऱ्याची पदोन्नती आमगाव पंचायत समितीमध्ये कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून झाली.
मात्र तेथे एकही दिवस नोकरी न करता राजकीय दबाव आणून आणि शस्त्रक्रिया झाल्याचे कारण देत अनुकंपा तत्वावर लागलेला एक कर्मचारी माध्यमिक विभागातील एका विशिष्ट टेबलाशिवाय दुसºया कुठल्याच कार्यालयात जिथे बदली झाली तिथे काम केल्याचे दिसून येत नाही. त्यावर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी कसे मेहरबान आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यातही कार्यालयातून कार्यमुक्त न होता सरळ रूजू झालेल्या त्या कर्मचाºयाला आमगावचे खंडविकास अधिकाºयांची मुकसंमती आहे का असा प्रश्नही निर्माण झाला आहे. तो कर्मचारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात वरिष्ठ सहायक पदावर असताना काय केले हे त्या विभागातील सर्वांनाच नव्हे तर खासगी माध्यमिक शाळांमधील सर्वच मुख्याध्यापक व शिक्षकांना ठाऊक आहे. जिल्हा परिषदेच्या सन २०१९ मध्ये झालेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये त्या कर्मचाºयाची देवरी येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात बदली झाली. मात्र तो तिथेही थांबला नाही. त्याने तिथून प्रतिनियुक्तीसाठी राजकीय व प्रशासकीय दबाव तंत्राचा वापर करु न घेतला. २८ मे २०१९ रोजी बदली झालेला व्यक्ती देवरीला ६ जून रोजी रूजू होते.
या काळात खूप आटापिटा केला आणि आपली बदली रद्द व्हावी म्हणून कसरत केली. परंतु यश न आल्याने शेवटी ११ सप्टेंबर २०१९ रोजी प्रतिनियुक्तीवर जिल्हा परिषदेत परत आणण्यात आले.
दरम्यानच्या काळात हा कर्मचारी कधीही देवरीतील कार्यालयात वेळेवर पोचला नाही. अशा कर्मचाऱ्याला आता पदोन्नती मिळाली. पदोन्नतीमध्ये आमगाव पंचायत समिती मिळाली असली तरी आपली प्रतिनियुक्ती गोंदियात करून घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत.

Web Title: Irregular orders of deputation are issued in Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.