शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित बसगाड्यांमुळे विद्यार्थिनींसह प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यातील साकोली आगारामधून साकोलीवरुन केशोरी करीता सुटणाºया सर्वच बसफेºया कधीच वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. या बसमध्ये प्रवासी सुद्धा असतात. त्यांना देखील निर्धारित वेळेत कधीच पोहोचता येत नाही. त्यामुळे त्यांची कामे खोळंबत आहेत.

ठळक मुद्देआगार व्यवस्थापकाचे दुर्लक्ष : शैक्षणिक नुकसान, आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : साकोली आगारातील बसगाड्या साकोली-केशोरी, साकोली-राजोली, साकोली-दिनकरनगर या दैनंदिन बसफेऱ्या सुरु असून या गाड्या कधीच वेळेत पोहोचत नाही. दररोज या गाड्यांच्या नियमित वेळापत्रकात बदलामुळे शालेय विद्यार्थिनीसह प्रवाशांना सुद्धा याचा फटका बसत आहे. गेल्या महिनाभरापासून हा प्रकार सुरू आहे.यामुळे बस ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नियमित बससेवा सुरू ठेवली नाही तर सावित्रींच्या लेकींना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.भंडारा जिल्ह्यातील साकोली आगारामधून साकोलीवरुन केशोरी करीता सुटणाºया सर्वच बसफेºया कधीच वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. या बसमध्ये प्रवासी सुद्धा असतात. त्यांना देखील निर्धारित वेळेत कधीच पोहोचता येत नाही. त्यामुळे त्यांची कामे खोळंबत आहेत. साकोलीवरुन ५.३० वाजताच्या दरम्यान सुटणारी साकोली-केशोरी रात्रफेरी बस नवेगाववरुन रेल्वे प्रवाशांना पिकप करुन पुढच्या प्रवासासाठी निघणे असा साकोली आगार प्रमुखांचा आदेश असताना सुद्धा ही बस फेरीचे चालक-वाहक रेल्वेच्या प्रवाशांची वाट न पाहता नवेगाववरुन बस सोडून पुढच्या प्रवासाला निघून जातात. परिणामी प्रवाशांना त्रास भोगून केशोरीपर्यंत यावे लागते. मानव विकास अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी बससेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.ही बस फेरीसुद्धा निश्चित केलेल्या वेळेत कधीच येत नाही. त्यामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत अहे. या बसच्या अनियमितपणामुळे या परिसरात परिवहन मंडळाविषयी असंतोष व्याप्त आहे. अनेकदा शाळा प्रमुखांनी यासंबंधी आगार प्रमुखाकडे तक्रार केली पण त्यांनी सुध्दा त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थिनी आणि प्रवाशांची समस्या कायम आहे. साकोलीवरुन केशोरीकरिता सुटणारी रात्रपाळीतील बस नवेगावबांध येथे रेल्वे प्रवाशी आल्याशिवाय सोडू नये,त्याचप्रमाणे गेल्या महिनाभरापासून साकोली-केशोरी, साकोली-राजोली, साकोली कुरखेडा,साकोली दिनकरनगर या बसफेऱ्या विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना ये-जा करण्यासाठी वेळेवर सोडण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थी संघटना प्रमुख पिंटू मशिद यांनी दिला आहे.

टॅग्स :state transportएसटी