शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळ्याची चौकशी सुरु

By admin | Updated: May 8, 2015 01:04 IST

येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत घोटाळा करण्यात आल्याची बाब समोर आली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केली आहे.

काचेवानी : येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत घोटाळा करण्यात आल्याची बाब समोर आली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करुन घोटाळा करण्यात आल्याचे आरोप करण्यात आले असले तरी या प्रकरणाची वास्तविकता तपासाअंती समोर येणार आहे. काही शेतकरी या प्रकरणाला सत्यतेचे रुप देत आहेत. तर काही शेतकरी निराधार व राजनितिक षडयंत्राचे रुप देण्यात आल्याचे सांगत आहेत. काचेवानी सेवा सहकारी संस्थेत अध्यक्ष पदावर १० वर्षापुर्वी पासून कार्यरत असणारे आर.एस.एस. चे तिरोडा तालुका कार्यवाह उमाशंकर चौकशी यांनी शेतकऱ्यांना माहिती न देता खोटे प्रस्ताव तयार करुन आणि खोट्या सह्या करुन शेतकऱ्यांच्या नावे पिक कर्ज घेवून करोडो रुपयांची उचल करुन स्वखर्चात आणल्याचा आरोप शेकडो शेतकऱ्यांनी करून सहकार क्षेत्र आणि मंत्रालया पर्यंत तक्रारी केलेल्या आहेत.तक्रारीच्या आधारावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके च्या कर्ज विभागात कार्यरत कर्मचारी सुरेश टेटे आणि वालदे यांनी चौकशी सुरु केली असून ग्रा.पं. कार्यालयात शेतकऱ्यांचे गऱ्हाने ऐकून घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. लवकरच त्यांच्याकडूनही प्रकरणाची तपासणी होणार असल्याची माहिती विश्वस्त सुत्रांनी दिली आहे. अध्यक्ष चौधरी यांनी, तत्कालीन संख्या सचिव बारापात्रे यांच्या साठगाठिने १४० ते १५० शेतकऱ्यांच्या नावाने बोगस कर्ज दाखवून तीन कोटींचा गैरव्यवहार केल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. वरिष्ठांना केलेल्या तक्रारीत सांगण्यात आले की, वर्तमान संस्था सचिव पटले यांनी ३१ आॅक्टोंबर २०१४ ला वसुलीचे नोटीस बजावले तेव्हा बोगस कर्ज काढण्यात आले आणि काही शेतकऱ्यांनी दिलेले कर्ज बँकेत जमा करण्यात आले नसल्याचे लक्षात आले.आरोपकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितले की, सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यां व्यतिरिक्त कर्ज देत नाही.मात्र कमला प्रभूदास पारधी यांच्या नावे शेती किंवा घर नसताना ३९ हजार ९२४ रुपये कर्ज दाखविण्यात आले आहे. त्यात लक्ष्मीचंद चौधरी यांनी २०१० मध्ये १० हजार ८०० रुपयांचे कर्ज घेतले होते. यांना ४१ हजार २२८ रुपये चे नोटीस बजावण्यात आले आहे. राजकुमार कटरे यांनी २००९ मध्ये २६ हजारांचे कर्ज घेतले. त्यांच्यावर ६२ हजार ७०९ रुपयांचे कर्ज काढण्यात आले व त्यांच्यावर ६९ हजार १० रुपयांचे कर्ज दाखविण्यात आले आहे.या व्यतिरिक्त दिलीप कटरे यांच्या नावाने २३ हजार ३८४ रुपयांचे कर्ज दाखविण्यात आले आहे. या प्रकरणाची तक्रार १६ जानेवारी रोजी तालुका उपनिबंधक, ३० मार्च रोजी तिरोडा पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक, खासदार नाना पटोले आणि तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांच्याकडे करण्यात आली आहे. (वार्ताहर)