चुरडी हत्याकांडाचा निष्पक्ष तपास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:30 AM2021-09-26T04:30:52+5:302021-09-26T04:30:52+5:30

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील ग्राम चुरडी येथे घडलेल्या बिसेन परिवारातील ४ सदस्यांच्या हत्याकांडातील आरोपी अद्यापही मोकाट आहेत. या घटनेचा ...

Investigate the Churdi massacre impartially | चुरडी हत्याकांडाचा निष्पक्ष तपास करा

चुरडी हत्याकांडाचा निष्पक्ष तपास करा

Next

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील ग्राम चुरडी येथे घडलेल्या बिसेन परिवारातील ४ सदस्यांच्या हत्याकांडातील आरोपी अद्यापही मोकाट आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त करीत हत्याकांडचा निष्पक्ष तपास करण्याची मागणी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख मुकेश शिवहरे यांनी केली आहे.

सोमवारी (दि.२०) ग्राम चुरडी येथील रेवचंद बिसेन त्यांच्या पत्नी, मुलगी व मुलाची हत्या करण्यात आली. आता या घटनेला ५ दिवस लोटूनही हत्याकांडातील आरोपी अद्याप मोकाट असून, यावरून पोलिसांच्या कार्यप्रणालीबाबत रोष व्यक्त केला जात आहे. एवढेच नव्हे, तर या हत्याकांडाचा सीआयडी-सीबीआयकडून तपास करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. या घटनेचा निष्पक्ष तपास व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन देऊन प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी शिवहरे यांनी केली आहे.

Web Title: Investigate the Churdi massacre impartially

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.