मेडिकल कौन्सिलच्या चमूकडून निरीक्षण

By Admin | Updated: December 5, 2015 09:07 IST2015-12-05T09:07:48+5:302015-12-05T09:07:48+5:30

मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाची (एमसीआय) एम चमू पुन्हा गुरूवारी गोंदियात पोहोचली. या चमूने मेडीकल कॉलेज सुरू करण्यासाठी आवश्यक गरजांची पूर्तता करण्यात आली किंवा नाही,...

Inspection by the Medical Council | मेडिकल कौन्सिलच्या चमूकडून निरीक्षण

मेडिकल कौन्सिलच्या चमूकडून निरीक्षण

गोंदिया : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाची (एमसीआय) एम चमू पुन्हा गुरूवारी गोंदियात पोहोचली. या चमूने मेडीकल कॉलेज सुरू करण्यासाठी आवश्यक गरजांची पूर्तता करण्यात आली किंवा नाही, याचे निरीक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत किती त्रुट्या दूर करण्यात आल्या याची पाहणीसुद्धा सदर चमू करीत आहे.
मेडीकल कॉऊंसिलची चमू आपल्या निरीक्षणाचा अहवाल दिल्यानंतरच गोंदियात मेडीकल कॉलेज पुढील सत्रापासून सुरू करण्याचा अंतिम निर्णय होणार आहे.
गुरूवारी एमसीआयच्या या चमूने गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात जावून निरीक्षण केले. केटीएस रूग्णालयाच्या विविध विभागांत जावून तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांशी चर्चा केली व तेथील दस्तावेजांचे निरीक्षण केले.
विशेष म्हणजे १८ नोव्हेंबर रोजी राज्य शासनाचय वतीने एक हलफनामा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करताना सांगण्यात आले होते की, गोंदिया मेडीकल कॉलेजच्या संदर्भात एमसीआयच्या चमूकडून सूचविण्यात आलेल्या त्रुट्या डिसेंबर महिन्यात दूर करण्यात येतील. यापूर्वी २९ व ३० डिसेंबर २०१४ व २७ एप्रिल २०१५ ला एमसीआयच्या दोन चमूंनी गोंदियात येवून मेडीकल कॉलेज सुरू करण्याबाबत चौकशी व निरीक्षण करून २५ त्रुट्या काढल्या होत्या.
मागील महिन्यात जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंदियात आले होते, तेव्हा त्यांनी आश्वासन दिले होते की, कोणत्याही स्थितीत पुढील वर्षापासून गोंदियात मेडीकल कॉलेज सुरू होईल. एमसीआय चमूबाबत विचारपूस केल्यावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते व डीन डॉ. अजय केवलिया यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. चमूचे सदस्य काही चर्चा करण्यास तयार नसल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Inspection by the Medical Council