शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी केली अतिवृष्टीबाधित जरूघाटाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:20 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी महसूल मंडळात १५ जुलै रोजी आलेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले.

शेती व घरांचे नुकसान : लांडगेच्या वारसाला चार लाखांची मदत लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी महसूल मंडळात १५ जुलै रोजी आलेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. शेती व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गावातील अनेक कुटूंब अतिवृष्टीने बाधित झाले. याच मंडळात येत असलेल्या चिचोली येथील शेतकरी महेंद्र लांडगे हा शेतातून घरी येत असताना वाहून गेला. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी अतिवृष्टीने बाधित झालेल्या केशोरी मंडळातील चिचोली, जरूघाटा व प्रतापगड या गावांतील शेतीची तसेच घरांची पाहणी करु न शाळेत व भक्तनिवास येथे आश्रयास असलेल्या कुटुंबांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोत जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कासीम जामा कुरेशी, माजी जि.प. सभापती उमाकांत ढेंगे, प्रकाश गहाणे, जि.प. सदस्य तेजुकला गहाणे, पं.स. सदस्य अर्चना राऊत, रामलाल मुंगनकर, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, तहसीलदार देवदास बोंबार्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, प्रतापगड सरपंच इंदू वालदे यांची उपस्थिती होती. चिचोली येथे पालकमंत्री बडोले यांनी मृत शेतकरी महेंद्र लांडगे यांची पत्नी वत्सला लांडगे हिचे सांत्वन करून नैसर्गिक आपत्ती अनुदानातून ४ लाख रूपयांचा धनादेश दिला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी जरूघाटा या गावाला भेट देवून पुष्पा लोगडे, मुन्ना तिवसकर व राजू तिवसकर यांच्या क्षतीग्रस्त घरांची पाहणी केली व गावातील चौकात उपस्थित ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. बाधित कुटुंबांना मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. जरूघाटा येथे ४० घरांचे अंशत: तर एका घराचे पूर्णत: नुकसान झाले असून हे नुकसान पाच लाख ८१ हजारांचे आहे. चिचोली-केशोरी रस्त्याची पाहणी करून अतिवृष्टीमुळे हा रस्ता खराब झाल्यामुळे तातडीने दुरूस्ती करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या प्रतापगड येथील भक्त निवासात आश्रयास असलेल्या ईश्वर शेंडे, इभाकर झलिपे, मनोहर राऊत,शिनश्वर मडावी, विनायक उईके या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. पालकमंत्र्यांनी यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देवून अतिवृष्टीमुळे बाधित शेती व क्षतीग्रस्त घरांचे योग्य प्रकारे सर्वेक्षण करण्यात यावे. कोणताही बाधित शेतकरी तसेच क्षतीग्रस्त घरे नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.