इनोव्हाच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 09:20 PM2018-02-25T21:20:28+5:302018-02-25T21:20:28+5:30

भरधाव वेगात असलेल्या इनोव्हाने दुचाकीस्वारासह रस्त्यावर उभ्या अन्य एका व्यक्तीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी असून दुसºया व्यक्ती मात्र ठार झाला.

Innova shock killed one | इनोव्हाच्या धडकेत एक ठार

इनोव्हाच्या धडकेत एक ठार

googlenewsNext
ठळक मुद्देरविवारी सकाळची घटना : दुचाकीस्वार गंभीर जखमी

ऑनलाईन लोकमत
सिरपूरबांध : भरधाव वेगात असलेल्या इनोव्हाने दुचाकीस्वारासह रस्त्यावर उभ्या अन्य एका व्यक्तीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी असून दुसºया व्यक्ती मात्र ठार झाला. येथील मुख्य चौकात सकाळी ११ वाजतादरम्यान ही घटना घडली. मृताचे नाव प्रभुदास कोटांगले असे आहे.
सविस्तर असे की, दुचाकी क्रमांक एमएच ३६- ए ९७५२ ने माणिक सुदराम आचले (रा.सिरपूर-बुधरीटोला) हे जात असताना त्यांना रायपूरकडून येत असलेल्या इनोव्हा क्रमांक एमएच ३४- एए ८८१८ ने जबर धडक दिली. एवढेच नव्हे तर अनियंत्रीत झालेल्या इनोव्हाने पुढे रस्त्यावर देवरीला जाण्यासाठी गाडीची वाट बघत असलेल्या प्रभुदास कोटांगले यांनाही धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार आचले जखमी झाले असतानाच कोटांगले गाडीच्या धडकेत दुरवर फेकल्या गेले.
या धडकेत कोटांगले यांच्या डोक्याला जबर मार लागला व दोघा जखमींना देवरी येथील ग्रामीण रूग्णालयात नेले. कोटांगले यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर रेफर करण्यात आले. मात्र त्यांना नागपूरला नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तर आचले यांना उपचारासाठी गोंदियाला पाठविण्यात आले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून तपास सुरू आहे.

Web Title: Innova shock killed one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात