शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक शेतीसाठी वीज प्रकल्पाचा पुढाकार

By admin | Updated: May 25, 2014 23:42 IST

दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत घसरत जात आहे. तो कायम ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी तिरोडा येथील अदानी ऊर्जा निर्मिती प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे.

तिरोडा : दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत घसरत जात आहे. तो कायम ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी तिरोडा येथील अदानी ऊर्जा निर्मिती प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी प्रकल्पातील कोळशाच्या राखेतून गांढूळ खताची निर्मिती करून ती परिसरातील शेतकर्‍यांना पुरविली जात आहे. याचा लाभ परिसरातील १८ गावांमधील शेतकर्‍यांना होणार आहे.

या उपक्रमानुसार या परिसरातील शेतकर्‍यांना गांढूळ खत बनवण्याचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. दोन महिन्याच्या काळात १000 शेतकरी १000 मेट्रिक टन फ्लायअँशने गांढूळ खत निर्मिती करू शकतात, असा अंदाज आहे. शेतकर्‍यांसह अंदाजे ४00 स्थानिकांना कवलेवाडा, धामणेवाडा, गराडा, चुरडी, काचेवानी, जमुनिया, बरबसपूरा, ठाणेगाव, भिवापूर, चिरेखाणी, चिखली व खामरी या गावातील गांढूळ खत निर्मितीबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

फ्लाय अँशचे शेणाच्या रुपात ऑरगॅनिक साहित्यासोबत १:१ या प्रमाणात मिश्रण कर करून ५0 दिवस त्यावर प्रक्रिया केली जाते. गांढूळ, राख व ऑरगॅनिक साहित्याच्या या मिश्रणात फॉस्फेट सोल्युबलायजिंग बॅक्टेरियाचे (पीएसबी) प्रमाण अनेक पटींनी वाढते.

यामुळे फ्लायअँशमधील लक्षणीय प्रमाणातील इनसोल्युबल मिनरलचे रुपांतर विरघळणार्‍या स्वरुपात करण्यास मदत होते आणि त्यामुळे व्हॅर्मिकम्पोस्टमधील पोषण मूल्यांची जैवउपलब्धता वाढते.

प्रकल्पाजवळच्या गावांमध्ये शेण मुबलक उपलब्ध आहे. त्यामुळे कोळशाची राख आणि गुरांचे शेण यांच्या योग्य व्यवस्थापनातून मोठय़ा प्रमाणात गांढूळ खत निर्मिती करणे शक्य होणार आहे. ज्यामुळे पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन होईलच, शिवाय त्यामध्ये समाविष्ट असलेली महत्वाची पोषणद्रव्ये जतन होण्यासाठीही मदत होणार आहे.

अदानी पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत जैन यांनी सांगितले की, आम्ही नेहमीच आमचे ऊर्जा प्रकल्प पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित वातावरणात चालवणार्‍या मताचे आहोत.

मुंद्रा (गुजरात) येथील गांढूळ खताच्या प्रायोगिक प्रकल्पाच्या यशानंतर आम्ही हा उपक्रम तिरोडा येथे यशस्वीपणे सुरू केला असल्याचे त्यांनी कळविले.(तालुका प्रतिनिधी)