शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

वायू प्रदूषणामुळे श्वसनाच्या रोगात वाढ

By admin | Updated: November 23, 2015 01:41 IST

ग्रामीण भागात फारशी कारखानदारी नसली तरी दिवसेंदिवस होत असलेला रसायनाचा उपयोग मोठ्या प्रमाणात वृक्षाची कटाई वाहणाऱ्या संख्येत होणारी झपाट्याने वाढ होत आहे.

गोंदिया : ग्रामीण भागात फारशी कारखानदारी नसली तरी दिवसेंदिवस होत असलेला रसायनाचा उपयोग मोठ्या प्रमाणात वृक्षाची कटाई वाहणाऱ्या संख्येत होणारी झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना श्वसनाचा रोगात दिवसे दिवस वाढ होऊन सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. ग्रामीण भागातील ग्राम पंचायत व आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचारी यांच्या निष्काळजी पणामुळे ग्रामीण भागात अस्वच्छता राहते. हे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यामागील मुख्य कारण आहे. गावातील मोऱ्यामध्ये साचलेला केरकचरा, धान, सांड पाणी, पिण्याचे दूषित पाणी यामुळे ही प्रदूषणात वाढ होऊन याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊन नवनवीन आजाराची उत्पत्ती होत आहे. यामुळे शासन प्रशासनाच्या प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंध विभागाने प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर शोध मोहीम सुरू करावी. तसेच प्रदूषणास कारणीभूत व्यक्तीवर कायदेशीर अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहेत. ठिकठिकाणी गावातील मोऱ्या व हॅन्डपंपचा भोवताल सांडपाणी जमा होते. हवेच्या प्रदूषणात ही वाढ होत आहे. त्या हॅन्डपंम्पाच्या पाणी उपयोगात आणल्यास हगवन, पोटाचे विकार उद्भवतात. सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे हवेत प्रदूषण होऊन श्वसनाचे विकारांचा प्रादुर्भाव होत आहे. विविध कार्यक्रम समारंभामध्ये स्पिकर, डी.जे. साऊंड सिस्टम अशा ध्वनिक्षेपकाचा आवाज वाजवी पेक्षा अती जास्त असल्यामुळे व अशा आवाजाच्या सतत सानिध्यात राहील्याने त्याचा परिणाम थेट हृदयावर होत आहे. त्याप्रमाणे कानावर ही परिणाम होऊन कायमस्वरूपी बहिरेपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने अशा प्रदूषणाबाबत सर्वत्र जनजागृती मोहिमांचे आयोजन करणे आवश्यक आहे. वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या सर्वात अधिक समस्या उद्भवत आहे. वायू प्रदूषण म्हणजे हवेमध्ये घातक, दूषित व उपायकारक पदार्थाचे मिश्रण होणे होय. डिझेल, पेट्रोल इतर इंधन, सिगारेट या माध्यमातून कार्बन मोनाक्साईड (रंगहीन वायू) बाहेर पडतो. त्यामुळे या वायूमुळे प्रदूषण जास्त होताना दिसते. या अपायकारक वायूचे प्रमाण वातावरणात वाढल्यामुळे प्राणवायूचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे शरीराची हालचाल मंदावत असून नागरिकांना अनेक शारीरिक समस्या जानवत आहे. तसेच रासायनिक प्रदूषणामुळे घरघुती नि:सरण, कारखानदारी औद्योगिक कचरा, अवशेष कचऱ्यातून होणारी गळती, वातावरणातील उत्सर्जन, घरघूती निर्मूलन हे वायू प्रदूषणाचे स्त्रोत आहेत. वायू प्रदूषणामुळे सर्वात घातक परिणाम श्वसन संस्थेवर होते. प्राणवायूच्या अभावाने फुफ्फुसे कमजोर होऊन निकामी होण्याचा मार्गावर आहे. दमाच्या आजारात वाढ होऊ लागली. कार्बन मोनोक्साईड हिमोग्लोबीनमध्ये आॅक्सिजनऐवजी मिसळून जातो. शरीरातील सर्व भागात पसरतो. त्यामुळे वायू अति विषारी असून याचा सरळ शरीरावर सर्वात मोठा परिणाम होऊन विविध आजाराची लागण होऊन प्राण गमवण्याची पाळी उद्भवत आहे. राज्य व केंद्र शासनाने रासायनिक प्रदूषणाबाबत अनेक कायदे केले आहेत. परंतु त्यांची अंमलबजावणी करणारे विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. वाहणाऱ्या इंधन, धूर यांची तपासण्या करणारे विभाग वेळोवेळी तपासणी करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. वाहनातून मोठ्या प्रमाणात धूरा कर्कश आवाज यानेही पर्यावरणाला मोठा जबर फटका बसून याचा परिणाम सरळ सजीव प्राण्यावर होत आहे. त्यामुळे चार चाकी वाहनात डिझेलच्या जागी केरोसिनचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढच होत आहे. पण प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंधक विभागाने प्रदूषण शोध मोहीम वेळोवेळी सुरू करुन प्रदूषण होण्याच्या स्त्रोताचा शोध घेऊन सबंधीतावर निर्धारीत करण्यात आलेल्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकाकडून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)