शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे विविध माध्यम कार्यांवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

शिक्षण विभाग विद्यार्थ्यासाठी शिक्षणाचे विविध पर्याय उपलब्ध करुन देत आहेत. यात जिओटीव्ही प्लॅटफॉर्म इयत्ता १२ वि विज्ञान, इयत्ता १० वी इंग्रजी, मराठी या दोन्ही माध्यमांसाठी ३ ज्ञान गंगा चॅनल, जिओ सावन या रेडीओच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच शिक्षण मंत्री ना. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाकडून नवनवे प्रयोग : चॅनल्स व अ‍ॅपद्वारे घरबसल्या शिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये म्हणून शासनाच्या शिक्षण विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्तवतीने सातत्याने विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तके वितरण करण्यात येत आहेत. शैक्षणिक दिनदर्शिका विकसीत करण्यात आली असून या आधारे दीक्षा अ‍ॅपच्या सहायाने विद्यार्थी स्वयंअभ्यास करु शकतात. ‘शाळा बंद-शिक्षण सुरु’ ही अभ्यासमाला सुरु करण्यात आली आहे. याच्या सहायाने देखील विद्यार्थी स्वयं अध्ययनाच्या कार्यात लागली आहेत. मात्र एवढे निश्चित ब्लॅकबोर्ड आणि शिक्षकाशिवाय विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावी होवू शकत नाही.शिक्षण विभाग विद्यार्थ्यासाठी शिक्षणाचे विविध पर्याय उपलब्ध करुन देत आहेत. यात जिओटीव्ही प्लॅटफॉर्म इयत्ता १२ वि विज्ञान, इयत्ता १० वी इंग्रजी, मराठी या दोन्ही माध्यमांसाठी ३ ज्ञान गंगा चॅनल, जिओ सावन या रेडीओच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच शिक्षण मंत्री ना. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या ३ चॅनलवरुन दररोज ६ तास अध्यापनाच्या तासिका प्रक्षेपित केल्या जाणार असून त्याच तासिका १७ तास पुन:प्रक्षेपीत करण्यात येणार आहेत.सद्यस्थितीत जिओ सिमधारकांना जिओटिव्ही याद्वारे चॅनल जिओ मोबाईल व इंटरनेटसुविधा असणे आवश्यक आहे. या सर्व शैक्षणिक सोई सुविधा शहरातील श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी अधिक लाभदायक होवू शकतात. मात्र यामध्ये ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी निश्चितच मागे पडतील यात शंका नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बोलकी पुस्तके सुद्धा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या सर्व शिक्षण प्रक्रिया मात्र प्रत्यक्षात ब्लॅकबोर्ड आणि शिक्षकाशिवाय अपुऱ्या आहेत.

टॅग्स :Educationशिक्षण