शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तातडीने द्या धानाचे बोनस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST

शासनाने सर्वसाधारण धानाला १८१५ तर उच्च प्रतिच्या धानाला १८३५ रुपये असा दर ठरवून ५० क्विंटलची अट घालून सरसकट ७०० रुपये बोनस मिळणार असे जाहीर केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना धान न देता आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या ग्राम मसरामटोला, दल्ली व डोंगरगाव येथील धान खरेदी केंद्रात धान विकले. याला जवळपास ३ महिन्यांचा कालावधी लोटला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : लग्न समारंभासाठी पैशाची गरज, महामंडळाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम मसरामटोला (कोयलारी), दल्ली (रेंगेपार) व डोंगरगाव (सडक) येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी ३ महिन्यांपूर्वी धान विकले होते. मात्र अद्यापही त्या धानाच्या बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही. अनेक शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न जुळलेले आहेत. तर काहींची उसनवारी देणे बाकी आहे. त्याकरिता पैशांची नितांत गरज असून बोनस त्वरीत द्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.शासनाने सर्वसाधारण धानाला १८१५ तर उच्च प्रतिच्या धानाला १८३५ रुपये असा दर ठरवून ५० क्विंटलची अट घालून सरसकट ७०० रुपये बोनस मिळणार असे जाहीर केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना धान न देता आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या ग्राम मसरामटोला, दल्ली व डोंगरगाव येथील धान खरेदी केंद्रात धान विकले. याला जवळपास ३ महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.बोनसची रक्कम मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मुला-मुलींचे लग्न जोडून टाकले. मार्च व एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नसराई असल्याने शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज आहे. तर काहींची उसनवारी देणे बाकी असून याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. वेळेवर पैसे मिळाले नाही तर सावकारांच्या दारात उभे राहण्याची पाळी येईल. या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. विक्री केलेल्या धानाच्या रक्कमेसोबत जर बोनसची रक्कम मिळाली असती तर असा प्रसंग उद्भवलाच नसता असे शेतकरी बोलत आहेत.या समस्येकडे लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी काळजीने लक्ष पुरवून त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम जमा करावी अशी एकमुखी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी