शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

मुरुम व रेतीचा अवैध उपसा

By admin | Updated: February 5, 2015 23:12 IST

मुरूम व रेतीच्या अवैध चोरीला उत आला आहे. खुलेआम नदी-नाला काठावरून मुरूम व रेतीची तस्करी केली जात आहे. परंतु महसूल व वनविभागाच्या दुर्लक्षामुळे या माफियांचा जोर

पांढरी/बाराभाटी : मुरूम व रेतीच्या अवैध चोरीला उत आला आहे. खुलेआम नदी-नाला काठावरून मुरूम व रेतीची तस्करी केली जात आहे. परंतु महसूल व वनविभागाच्या दुर्लक्षामुळे या माफियांचा जोर वाढतच चाला आहे. त्यामुळे आता ठोस कारवाईचीच गरज आहे.पांढरी जवळील रेंगेपार परिसर नैसर्गिक वनसंपदेने नटलेले आहे. येथील नाल्यावर मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे. व्यापारी वर्ग संगनमत करून या नाल्यातून रेतीचा अवैध उपसा करीत असतानाही महसूल व वन विभागाचे अधिकारी धृतराष्ट बनल्याचे दिसून येत आहे.रेंगेपार नाल्यातून रेतीचा उपसा करून मालीजुंगा मार्गाने वाहतूक केली जात आहे. याची तक्रार वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांही करण्यात आली आहे. रेती चोरीवर आळा घालण्यासाठी येथील वनरक्षकांनी नाल्याकडे येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गावर नाली घातली होती. मात्र रेती माफियांनी दुसऱ्या ठिकाणावरून रस्ता तयार करून रेतीचे उत्खनन करणे सुरूच ठेवले आहे. वन विभागाने काहीही कारवाई न केल्यामुळे रेती माफियांचा जोर वाढत आहे. बाराभाटी जवळील पंचवटी (देवलगाव) या ठिकाणी खुलेआम मुरुमाची तस्करी दिवसाढवळ्या, रात्री-बेरात्री २३ जानेवारीपासून सुरु आहे. परिसरातील पदाधिकारी दुर्लक्ष करीत असल्यानेच मुरुमाची अवैध वाहतूक सुरू आहे. पण या वाहतुकीला आळा घालण्यासाठी कुणीच पुढाकार घेत नाही. अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अवैध धंद्यांना ऊत आला आहे. अधिकारी वर्ग तर आपले डोळे बंद करुन प्रशासकीय कार्यात मग्न आहेत. याचाच फायदा परिसरातील खासगी कंत्राटदार घेवून मुरुमाची अवैध वाहतूक करीत आहेत. सदर अवैध वाहतुकीबाबद तहसीलदारांना माहिती दिल्यावर ते कारवाई करू म्हणतात, मात्र काहीच करीत नाही. परिसरामध्ये तलाठी कार्यालय देवलगाव साजा-६ असून या कार्यालयाचे तलाठी कोणते काम करतात, हे कळतच नाही. कधी- कधी तर कार्यालय बंदच दिसतो, असे नागरिक सांगतात. या सर्व बाबींना तहसील कार्यालयाचे अधिकारी जबाबदार आहे. त्यांचे कर्मचाऱ्यांवर वचक नसल्यामुळे प्रशासकीय कामात अनागोंदी कारभार सुरु दिसतो.मुरुमाचे अवैध उत्खनन पंचवटी (देवलगाव) परिसरात जेसीबी व मजुरांच्या सहकार्यातून केले जात आहे. मुरुम खोदकाम सुरूच असून सदर अवैध मुरुम स्थानिक प्रशासनाच्या कामासाठी व खासगी कार्यासाठी चोरले जात आहे.मुरूमाचे अवैध उत्खनन थांबवून अवैध वाहतूक तत्काळ बंद करण्यात यावी, उत्खनन होण्याऱ्या स्थळांची पाहणी करण्यात यावी व चौकशी करुन शासकीय नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)