शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बालकसरीच्या जंगलात रानडुक्कर समजून अस्वलाची शिकार

By admin | Updated: November 10, 2015 02:24 IST

तालुक्यातील बालकसरी येथील जंगलात रानडुक्कर समजून अस्वलाची शिकार करुन त्याच्या मांसाची आपसात वाटून खाण्याची घटना घडली.

पाच आरोपींना अटक : १९ पर्यंत न्यायालयीन कोठडीसालेकसा : तालुक्यातील बालकसरी येथील जंगलात रानडुक्कर समजून अस्वलाची शिकार करुन त्याच्या मांसाची आपसात वाटून खाण्याची घटना घडली. सालेकसाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. अवगान यांनी कारवाई करुन त्या आरोपींना अटक केली. सर्व आरोपींना १९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी भंडारा येथील कारागृहात करण्यात आली.सालेकसा वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत बाकलसरी गाव येत असून गावाच्या जवळील जंगलात ३ नोव्हेंबर रोजी रानडुक्कर समजून कोवाचीटोला निवासी महरु हंसराज पंधरे (२२) याने कुऱ्हाडीने प्रहार करुन अस्वलाला मारून टाकले. त्यानंतर बाकलसर्रा निवासी तेजलाल किसन मडावी (४५), रुपचंद सखराम उईके (५०) आणि हिरालाल झिंगू कोराम (४५) यांना याची माहिती दिली. पाच लोकांनी मिळून त्या अस्वलाचे तुकडे करून मांस वाटून घेऊन त्याचा जेवनात उपयोग केला.याबाबतची माहिती एफडीसीएमच्या एका कर्मचाऱ्याला माहिती मिळाली. त्याने आपल्या सहकाऱ्यासोबत तेजलाल मडावी, रुपचंद उईके आणि हिरालाल कोराम यांना पकडले. रामपाल मडावी आणि महारु पंधरे यांनी पलायन केले. एफडीसीएमच्या कर्मचाऱ्यांनी या बाबतची माहिती सालेकसा वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. अवगान यांना दिली. अवगान, सहायक वनसंरक्षक यु.टी. बिसेन, सी.जी. मडावी, आर.एस. भगत, डी.एन. गौर, पी.एस. मेंढे, एफ.सी. शेंडे, आर.जी. जतपेले, एस.एच. रहांगडाले आणि वाय.झेड. शेख यांनी घटनास्थळ गाठून तेजलाल मडावी, रुपचंद मडावी आणि हिरालाल कोराम यांना अटक केली. ४ नोव्हेंबरला त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यात ६ नोव्हेंबरपर्यंत वनविभागच्या कस्टडीमध्ये ठेवण्यात आले. ६ नोव्हेंबर रोजी रामलाल मडावी आणि महारु पंधरे यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. ६ नोव्हेंबर रोजी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता १९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालीन कोठडी देण्यात आली असून त्यांची रवानगी भंडारा येथील कारागृहात करण्यात आली आहे. या भागात रानडुकराची शिकार वाढली असून वनविभागाने अजून दक्ष राहण्याची गरज आहे.