ऑनर किलिंग की प्रेमात मिळाला धोका; कुणी मारले आचलला ? गोंदिया जिल्ह्यात खळबळजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 14:43 IST2025-10-10T14:41:04+5:302025-10-10T14:43:20+5:30
Gondia : धारदार शस्त्राने गळा चिरून एका २० वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.९) सकाळी बोंडराणी (अर्जुनी) गाव शिवारात उघडकीस आली.

Honor killing or love affair; Who killed him? Sensational incident in Gondia district
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : धारदार शस्त्राने गळा चिरून एका २० वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.९) सकाळी बोंडराणी (अर्जुनी) गाव शिवारात उघडकीस आली. आचल प्रकाश कोबळे (रा. बोंडराणी) असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
गोंदिया तालुक्यातील बोंडराणी हे गाव वैनगंगा नदी काठावर आहे. कोबळे कुटुंबीय मासेमारी व शेतमजुरी करतात. आचलचे गावातीलच दुसऱ्या समाजातील एका युवकासोबत सूत जुळले होते. त्यांच्या विवाहाला दोन्ही कुटुंबीयांकडून विरोध असल्याने ते पळून गेले होते. काही दिवसांपूर्वी ते गावात परत आले. दोन्ही कुटुंबात चर्चा झाल्यानंतर आचल वडिलांच्या घरी परतली. आचलच्या कुटुंबीयानी तिच्यासाठी स्थळ बघितले होते. गुरुवारी तिला पाहण्यासाठी पाहुणे येणार होते अशी चर्चा गावात होती. दरम्यान, गुरुवारी सकाळच्या सुमारास शेजारील महिलेला आचलच्या घरापासून काही अंतरावर ती बेशुद्धावस्थेत आढळली. तिच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे घाव आढळले.
आरोपीचा शोध सुरू
आचलच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे घाव आढळले. त्यामुळे तिची हत्या झाल्याचा संशय असून दवनीवाडा पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून तपासाला सुरुवात केली आहे. तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केल्याची माहिती आहे.