आरोग्य कर्मचाऱ्यांचे घरोघरी सर्व्हेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:00:28+5:30
बाहेरून आलेल्या लोकांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने अशांवर नजर ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने हे सर्व्हेक्षण सुरू केले आहे. यासाठी सहायक परिचारिका जी. डी. वाहणे, आर.ओ. पडोळे, मलेरिया वर्कर पांडे, आशा वर्कर किरण तुमसरे, सुशीला मेश्राम गावात घरोघरी फिरतांना दिसत आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांचे घरोघरी सर्व्हेक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र ठाणा अंतर्गत आरोग्य उपकेंद्र गोरठा येथील कर्मचारी घरोघरी सर्व्हेक्षण करताना दिसत आहेत. भर उन्हात हे कर्मचारी आपली सेवा देत असून गावातील घरोघरी फिरतांना दिसत आहेत.
बाहेरून आलेल्या लोकांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने अशांवर नजर ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने हे सर्व्हेक्षण सुरू केले आहे. यासाठी सहायक परिचारिका जी. डी. वाहणे, आर.ओ. पडोळे, मलेरिया वर्कर पांडे, आशा वर्कर किरण तुमसरे, सुशीला मेश्राम गावात घरोघरी फिरतांना दिसत आहे. हैदराबाद, मुंबई, पुणे, नागपुर आदि मोठया शहरांतून परत आलेल्या लोकांच्या घरी जाऊन त्यांची माहिती घेणे, कोरोना विषयावर जनजागृती करणे, कोरोनाची माहिती देणारे स्टिकर लावून घरीच राहण्याची सल्ला ते देत आहेत. विशेष म्हणजे, त्यांना मास्क, हातमोजे व सॅनिटायझर देण्यात आले नाहीत. आपला जीव धोक्यात सर्व्हेक्षण करीत असलेल्या या कर्मचाऱ्यांसाठी मात्र विभागाकडून कुठल्याही प्रकारची मदत दिली जात नसल्याचे दिसत आहे.