Help the needy but do not forget the nearest ones | गरजूंना जरुर मदत करा पण जवळच्यांचा विसर नको

गरजूंना जरुर मदत करा पण जवळच्यांचा विसर नको

ठळक मुद्देत्यांनाही द्या मदतीचा हात : अभय सावंत यांनी ठेवला आदर्श, इतरांनी घ्यावा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. तर गरजूंच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहे. मात्र ही मदत करताना जवळच्यांच काहींना विसर पडत आहे. गरजूंना मदत जरूर करा पण आपल्या घरी, दुकानात, आपला व्यवसाय वाढविण्यात ज्यांची मोलाची भूमिका बजावली अशा जवळच्या गरजू माणसांचा विसर मात्र पडू न देता त्यांनाही प्राधान्याने मदत करा, हाच मुलमंत्र जपण्याचा महत्त्वपूर्ण संदेश गोंदिया येथील एका व्यावसायिकांने दिला आहे.
देश आणि राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे हा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठीच देशाभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर नागरिकांनी या कालावधी घराबाहेर पडू नये, यासाठी संचारबंदी व जमावबंदीसारखे कायदे लागू करण्यात आले आहे.लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद पडल्याने रोजगारासाठी बाहेरील राज्य आणि जिल्ह्यात गेलेले मजूर आपल्या कुटुंबासह आता आपल्या गावाकडे परतत आहेत. मात्र त्यांचा रोजगार बुडाला असल्याने त्यांच्या समोर दोन वेळेच्या जेवनाचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा गरजूंच्या मदतीसाठी अनेक स्वंयसेवी व सामाजिक संस्था आणि समाजातील दानशूर पुढे येऊन मदत करीत आहेत. ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. मात्र ही मदत करीत असताना बºयाच जणांना आपल्या अवतीभवती असणाºया आणि आपल्या नेहमी संपर्कात येणाºया गरजूंचा विसर पडत आहे. नेमकी हीच बाब हेरुन गोंदिया येथील व्यावसायिक अभय सावंत यांनी त्यांच्या दुकानात व त्यांच्या संपर्कातील गरजू व्यक्तींची यादी तयारी करुन त्यांना महिनाभराचे अन्नधान्य उपलब्ध करुन दिले.
सावंत यांचे गोंदिया रेल्वे स्थानकावर कॅटिंग आणि रेल्वे फलाटावर शॉप आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची कॅटिंग बंद झाली. जेव्हा कॅटिंग सुरू होती तेव्हा त्यांच्याकडे ४० च्यावर वेंडर काम करीत होते. तर त्यांच्या दुकानात सामान आणून देणारा रिक्षा चालक, पाणी आणून देणार, झाडू मारणारा, घरी भांडीधूनी करणारी घरकामगार महिला व तसे त्यांच्या या व्यवसायात त्या मदत होणारे अनेक गरजू व्यक्ती त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आधी या सर्व जणांची एक यादी तयार केली जवळपास ७० ते ८० नावे त्यांच्या अवतीभवती आणि नेहमी संपर्कात येणाºया गरजू व्यक्तींची झाली. त्यांनी या सर्वांना एक महिन्याचे किराणा सामान आणि अन्नधान्य त्यांना घरपोच पोहचवून दिले. तसेच लॉकडाऊनच्या कालावधी या गरजूंची पायपीट होवू नये म्हणून त्यांनी त्यांच्या परिसरातच असणाºया किराणा दुकानातून हे साहित्य कसे उपलब्ध होईल, यासाठी त्यांच्याकडे काम करणाºया प्रदीप बागडे व अनिल हुमणे यांच्याकडे जवाबदारी सोपविली. त्यांनी सुध्दा ती तेवढ्याच जवाबदारीने पार पाडली. त्यामुळेच या गरजूंना त्यांच्या घरी थेट मदत पोहचल्यानंतरच त्यांना याची माहिती मिळाली. आज आपण त्यांच्याकडे काम करीत नसलो तरी सावंत यांनी आपली जाणीव ठेवून आपल्या गरजेच्या काळात मदत केल्याबद्दल त्यांना फोन करुन त्यांचे आभार सुध्दा मानले. एवढेच नव्हे तर लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास पुन्हा सर्वांना एक महिन्याचा किराणा आणि अन्नधान्य देण्याची तयारी सावंत यांनी करुन ठेवली आहे. अभय सावंत यांच्याप्रमाणेच इतरांनी ही आपल्या जवळच्या आपल्या नेहमी संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेवून मदत केल्यास कुणावर उपासमारीची वेळ येणार नाही. तसेच या गरजूवंताना सुध्दा आपल्या पडत्या काळात कुणी धावून आल्याची जाणीव होईल.

ज्या व्यक्तींमुळे आपल्या व्यवसायास हातभार लागला असेल अशा गरजूंचा शोध घेऊन मदत करण्याची हीच योग्य वेळ आहे. संकटाच्या काळात गरजूंना अवश्य मदत करा, पण आपल्या अवतीभवती आणि नेहमी संपर्कात येणाºया गरजूंचा विसर न पडू देता त्यांची आवश्यक मदत करा. यासर्वांना आपण घरीच बसून मदत करु शकतो यासाठी आपल्याला घराबाहेर सुध्दा पडण्याची गरज नाही. अशाच जवळच्या गरजूंचा शोध घेऊन मदत केल्यास कुणीही उपाशी राहणार नाही.
- अभय सावंत,
व्यावसायिक गोंदिया.

पीएस,सीएम फंडात जमा करा मदत
गरजूवंतांना मदत करण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे येत आहे.ही खरोखरच माणुसकीचे दर्शन घडविणारा बाब आहे. ज्या अशा गरजूंची मदत करायची त्यांनी मुक्त हस्ताने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री मदत निधी मदत द्यावी.पण ही मदत करताना आपल्या जवळच्या आणि नेहमी संपर्कात येणाºयाचा मात्र विसर पडता कामा नये.

Web Title: Help the needy but do not forget the nearest ones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.