शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
7
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
8
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
9
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
10
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
11
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
12
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
13
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
14
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
15
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
16
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
17
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
18
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
19
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
20
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराने रुग्णांना त्रास

By admin | Updated: June 11, 2014 23:21 IST

सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्र चर्चेचा विषय बनला आहे. वारंवार मागणी करुनही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून डॉक्टर उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्र चर्चेचा विषय बनला आहे. वारंवार मागणी करुनही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून डॉक्टर उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याठिकाणी एकच डॉक्टर असल्याने रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नसल्याची ओरड होत आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार उपकेंद्र व चोवीस गावांचा समावेश आहे. परंतु सर्व कार्यभार एकाच डॉक्टरवर अवलंबून असल्याने रुग्णांना वेळेवर सेवा मिळणे कठीण होते. तत्कालीन जिल्हा अधिकाऱ्यांनी पैशाच्या हव्यासापोटी पुनर्नियुक्त्यांची खैरात वाटली. नविन पदारूढ झालेल्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे लक्ष पुरवायला वेळ नाही व त्यामुळे शेवटी रुग्णच सेवेअभावी भरडला जातो. ७ जून रोजी दुपारी येथील नागरीक नुतन बंसोड हा आपल्या घराची छावणी करत असताना त्याच्या हाताला सिमेंट पत्र्यांनी दुखापत झाली. तो उपचार घेण्याकरिता आरोग्य केंद्रात गेला असता तेथे फक्त बोरकर नावाची शिपाई होती. तीनेच मलमपट्टी करून दिली.
शेंडा परिसर आदिवासी क्षेत्रात मोडत असून नक्षलग्रस्त भाग म्हणून त्याची ओळख आहे. याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्य इमारत आहे.
शासनाकडून आरोग्य सेवेचा धिंडोरा पिटला जातो. परंतु वास्तविकता वेगळीच आहे. एकच डॉक्टर असल्याने त्यांचेकडे मिटींग, रिपोर्ट, सर्व्हे यासारख्या अनेक कामांचा भार आहे. त्यामुळे ते २४ तास सेवा देऊ च शकत नाही. अनेकदा येथील आरोग्य केंद्रात रुग्णांची ओरड होते. सेवेअभावी कित्येकांनी त्या डॉक्टरवर ताव मारला. प्रसार माध्यमांव्दारे वारंवार डॉक्टरची मागणी करण्यात आली. परंतु जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील डॉक्टर शासकीय कामानिमित्त अथवा रजेवर गेले असता दुसरा डॉक्टर नसल्याने रुग्ण सरळ बातमीदाराच्या घरावर हल्ला चढवून आपली कैफियत मांडतानाचे चित्र बरेचदा घडले. तरी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे जातीने लक्ष पुरवून २४ तास सेवा देण्यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्राला त्वरीत डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातील जनता करीत आहे. (वार्ताहर)