शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मूठभर तांदूळ अन् पाण्याची वाटी, अंगणात ठेवा चिमण्यांसाठी

By admin | Updated: April 25, 2016 01:36 IST

लहानपणी जेवणाचा कंटाळा केला की, आई हमखास दाणा टाकून चिमण्यांना बोलवायची दारात़ मग ...

गोंदिया : लहानपणी जेवणाचा कंटाळा केला की, आई हमखास दाणा टाकून चिमण्यांना बोलवायची दारात़ मग त्यांचे कौतुक दाखवत एकेक घास भरायची तोंडात़ बालपणी पहिल्यांदा ही अशी ओळख झाली आपली चिऊताईशी! तेव्हापासून ती मनाच्या चौकटीत कायम बसली आहे घरटे करूऩ संगणकाच्या युगातही तिचे आकर्षण कमी झाले असे अजिबात नाही़ परंतु व्यक्तिगत स्वप्ने नक्कीच मोठी झाली अन् या स्वप्नांच्या उंचीशी स्पर्धा आपल्या लाडक्या चिमण्यांना काही करता आली नाही़ याच उंची स्वप्नांनी पुढे त्यांचे घरटेही हिरावून घेतले़ आता तर त्यांना दोन थेंब पाणीही मिळणे दुरापास्त झाले आहे़; म्हणूनच या चिमण्या आपल्याला साद घालत आहेत़ ऐका जरा ती साद अन् आपल्या बालपणाच्या या सोबत्यांना जगविण्यासाठी मूठभर तांदूळ आणि एक पाण्याने भरलेले भांडे ठेवा आपल्या दारात़चिऊताई म्हणते,‘चिल्यापिल्यांना घास भरवताना मी प्रत्येकच मायबापाच्या मदतीला धावून गेली. आज मला तुमच्या आधाराची गरज आहे. तुम्ही फटाक्यांच्या आवाजाने मला दिवाळीत बधीर केले. संक्रातीला नायलॉनच्या मांजाने माझा गळा कापला. आता आमच्यावर संक्रांत कशाला आणता? मला माहीत आहे. आता इथली जुनी घरे जात आहेत. सिमेंटचे चकाचक जंगल उभे राहात आहे. (तालुका प्रतिनिधी)चिमणी संवर्धनासाठी तुम्ही द्या आधार घरात चिमणी आली तर ‘इंटेरियर’ची वाट लागेल, असेही काही जण म्हणत आहेत. माझी ओली आळवणी एवढीच आहे, मूठभर तांदूळ अन् वाटीभर पाणी... अंगणात ठेवा ना माझ्यासाठी...’’ चिमण्यांची चिमणी पाखरं लहानसहान कीटकांवर वाढतात. हे कीटकही जंतूनाशकांच्या वाढत्या वापरामुळे मरत आहेत. कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याने त्यावर जगणाऱ्या चिमण्यांना अन्न मिळेनासे झाले अन् त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे.मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींमुळे चिमण्यांसह एकूणच पक्ष्यांच्या नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होत आहे. शहरात सुरू असलेली प्रचंड वृक्षतोड, शहरीकरणाचा आंधळा वेग चिमण्यांच्या जीवांवर उठला आहे. खरे तर परिसरात जास्तीतजास्त चिमण्यांचे वास्तव्य असले पाहिजे. काँक्रिटच्या जंगलातील वास्तूरचना चिमण्यांसाठी पोषक नाही. जुन्या वह्यांचे पुठ्ठे काढून त्यापासून चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करता येतात. ती शाळेच्या परिसरात अन् अंगणात लावता येतात. घर बांधतानाच घरात चिमण्यांसाठी विशिष्ट जागा शिल्लक ठेवता येते. चिमणी हा मनुष्याच्या आसपास राहणारा पक्षी असल्याने त्यांना घराच्या परिसरातच घरट्यासाठी जागा हवी असते. घरटे बांधण्यासाठी योग्य जागा मिळत नाही म्हणून अनेकदा त्या धोक्याच्या ठिकाणी घरटे तयार करतात. त्यामुळे त्यांची अंडी सुरक्षित राहात नाही. योग्य आहाराविना पिल्लांची वाढ योग्यप्रकारे होत नाही.