शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा गेला, खर्रा वाढला, तंबाखू मात्र कायम

By admin | Updated: May 30, 2014 23:57 IST

तंबाखूचे दुष्परिणाम पाहता राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यात सर्वत्र गुटखा आणि नंतर खर्‍र्यावर बंदी घातली. पण यामुळे खाण्यार्‍यांवर कोणताही फरक पडलेला नाही.

बंदी नावाचीच : पानठेले, चालत्या रेल्वेतही सर्रास मिळतो गुटखा, खर्रामनोज ताजने - गोंदियातंबाखूचे दुष्परिणाम पाहता राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यात सर्वत्र गुटखा आणि नंतर खर्‍र्यावर बंदी घातली. पण यामुळे खाण्यार्‍यांवर कोणताही फरक पडलेला नाही. प्रत्येक पानठेल्यावर आजही बिनधास्तपणे खर्रा विकल्या जातो. फरक एवढाच आहे, आधी जो खर्रा १0 ते १२ रुपयाला मिळत होता तो आता १५ रुपयाला विकत घ्यावा लागतो. दुष्परिणाम कळत असूनही शौकिन मात्र त्यापासून दूर वळत नसल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.नागपूर-कोलकाता या मुख्य रेल्वेमार्गावर असलेल्या गोंदियात अनेक गोष्टी रेल्वेतून चोरट्या मार्गाने येतात. त्यात खर्‍र्यासाठी लागणार्‍या सुगंधित तंबाखूचाही समावेश आहे. व्यापार नगरी असलेल्या गोंदियात अनेक व्यापार्‍यांचे देशातील सर्व प्रमुख शहरांमधील व्यापार्‍यांशी लागेबांधे आहेत. त्यातूनच रेल्वेतून छुप्या मार्गाने गोंदियात दररोज तंबाखू पोहोचतो. हा तंबाखू पानठेल्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीसुद्धा व्यापार्‍यांचे नेटवर्क व्यवस्थितपणे काम करते. एवढेच नाही तर बंदी असलेले गुटख्याचे पाऊच आणि पान मसालेसुद्धा गोंदियात उपलब्ध होतात. त्यामुळे शासनाने कितीही बंदी घातली असली तरी शौकिनांवर त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. आधी २ रुपयात मिळणारी गुटख्याची पुडी आता ४ ते ५ रुपयाला आणि १0 रुपयात मिळणारा खर्रा आता १५ रुपयात विकला जातो.राज्य शासनाने घातलेल्या बंदीनंतर गुटख्याचे प्रमाण कमी झाले असले तरी खर्‍र्याचे प्रमाण वाढले आहे. कोणतेही सरकारी कार्यालय असो, की शिक्षण देणारी ज्ञानमंदिरे असो, अध्र्यापेक्षा जास्त कर्मचारी खर्‍र्याचे शौकिन असल्याचे दिसून येते. दिवसाला १00 रुपये खर्‍र्यात उडविणारे अनेक महाभाग पहायला मिळतात. स्वत:च्या मुलांसाठी कधी ५ रुपयाचे चॉकलेट न नेणार्‍यांना स्वत:चा शौक पूर्ण करण्यासाठी महिन्याकाठी हजारो रुपये खर्च करताना काहीच वाटत नाही.आधी घोटलेला तंबाखू ओठात ठेवणार्‍यांचे प्रमाण बरेच होते. आता अशा प्रकारे तंबाखू खाणे कमीपणाचे दिसत असल्यामुळे चिमूटभर तंबाखूची जागा खर्‍र्याने घेतली आहे. प्रत्येक कर्मचार्‍याच्या खिशात खर्‍र्याची पुडी दिसत असल्यामुळे त्याच्या पिचकार्‍यांनी अनेक सरकारी कार्यालयांच्या भिंती आणि कोपरे रंगलेले दिसतात.तंबाखूच्या सेवनाला आळा बसून समाजस्वास्थ्य चांगले राहावे यासाठी सरकारने कायद्याचे बंधन घालून तंबाखूपासून शौकिनांना लांब जाण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र सोबत जनजागृतीची जोड दिली नसल्यामुळे ग्रामीण भागात अनेकांना तंबाखूच्या दुष्परिणामांची कल्पनाच नाही. त्यामुळे प्रभावीपणे जनजागृती कार्यक्रम राबवून दुष्परिणामांची कल्पना दिल्यास खर्रा, तंबाकू, गुटख्याला बर्‍याचा प्रमाणात हद्दपार करण्यास मदत होणार आहे.