शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून धान उत्पादक शेतकऱ्यांची होतेय थट्टा

By admin | Updated: November 17, 2014 22:57 IST

केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. अडीच हजार रुपये प्रति क्विंटल धानाला भाव द्या, अशी मागणी करणारेच आता शेतकऱ्यांची थट्टा करीत आहेत,

अर्जुनी/मोरगाव : केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. अडीच हजार रुपये प्रति क्विंटल धानाला भाव द्या, अशी मागणी करणारेच आता शेतकऱ्यांची थट्टा करीत आहेत, असा आरोप तालुका शिवसेनेने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे केला आहे. केंद्र व राज्यात आघाडी शासन सत्तेवर होते. पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन रान माजविणारेच आता सत्तेत आहेत. त्यावेळी प्रति क्विंटल अडीच हजार रुपये धानाला भाव द्या, अशी भाजपची मागणी असायची. सत्तेवर येताच त्यांना या धानाच्या भाववाढीचा विसर पडला आहे. प्रति क्विंटल केवळ ५० रुपये भाववाढ देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचा प्रकार सत्तारुढ शासनाने केला. शेतकरी विरोधी या शासनाचा शिवसनेने निषेध व्यक्त करून धानपिकाला उत्पादन खर्चावर आधारित भाववाढ देण्याची मागणी केली आहे. चालू खरीप हंगामात उत्पादित झालेल्या धानपिकाची आधारभूत हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. शासनाच्या निर्णयाप्रमाणे धान खरेदी केंद्राना इलेक्ट्रानिक वजनकाटे पुरविण्यात आले. परंतु धान खरेदी करणाऱ्या संस्था व अधिकाऱ्यांच्या संगनमताने सध्या खरेदी सुरू आहे. साध्या वजनकाट्याने सुरू असलेल्या खरेदीमुळे शेतकऱ्यांचे क्विंटलमागे दीड ते दोन किलो नुकसान होत आहे.साध्या वजनकाट्याने सुरू असलेली खरेदी त्वरीत बंद करण्यात यावी व इलेक्ट्रानिक्स वजन यंत्राने धान खरेदी व्हावी. अन्यथा येत्या ८ ते १० दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने जिल्हा उपप्रमुख शैलेशकुमार जायस्वाल, महिला प्रमुख किरण कांबळे, तालुका प्रमुख संजय पवार व कार्यकर्त्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)